![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धा-२०२०
लेख लेखनाचा विषय : शेती आणि कोरोना
शीर्षक: कोरणामुळे शेतीवर झालेले दुष्परिणाम
भारतातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय "शेती" आहे. भारतातील ७०% लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि त्यामुळेच शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि त्यामुळेच ग्रामीण भागातील सर्व नागरिक शेतीस प्रथम प्राधान्य देत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगावर "कोरोना" या एका रोगाने अक्षरशः फार मोठे थैमान घातले आहे आणि संपूर्ण जगाला या रोगाने विळखा घालून दहशत माजवली आहे. भारत देश हा देखील त्यास अपवाद नाही.
कोरणामुळे संपूर्ण निसर्ग, सजीवसृष्टी, रोजगार, उद्योगधंदे, पर्यावरण, शिक्षण, आर्थिकस्तिथी यांसारख्या अनेक घटकांवर फार भयानक परिणाम झालेले आहे. शेतीवर सुद्धा याचे अनेक वाईट परिणाम झालेत. भारतात मार्च महिन्याच्या अखेरीस पहिला कोरोना रुग्ण सापडला आणि संपूर्ण देशात एक भयभीत शांतता पसरली. त्यावेळीस राज्य तसेच केंद्र सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. या कारणाने आजही संपूर्ण मानवी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याच काळापासून अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत, संपूर्ण ठिकाणी बेकारी आणि उपासमारीची लाट पसरलेली आहे. ज्या लोकांचे घर दैनंदिन मिळकतीवर चालते अशा सर्व लोकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागलेले आहे. घराबाहेर येणे म्हणजे रोगाला आमंत्रण देणे तसेच कायद्याचे पालन केले नाहीतर कडक शिक्षा याच दोन मुख्य कारणांमुळे सर्व लोकांनी घरीच राहायचे ठरवले आणि स्वतःचे रक्षण करून सरकारला सुद्धा सहकार्य केले आहे.
कोरोनामुळे शेतीवर अनेक वाईट परिणाम झालेत. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन पोहचली आहे. पण काही शेतकऱ्यांनी स्वतःचे मनोबल कमी न करता खंबीर राहून धीटपणे या प्रसंगाशी मुकाबला केला आणि कसे का होईना या कठीण काळातही आणि खडतर प्रवासातून मार्ग काढून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काही शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन अगदी उत्साहाने आणि जोमाने शेती केली पण त्यांच्या या आनंदाच्या क्षणावर कोरोनाने पाणी फिरवले आहे. शेतकऱ्यांनी जरी शेती केली आणि त्याच पीक घेतलं असले तरीही पुढच्या प्रक्रियेसाठी मजूरच मिळत नाही आहे आणि या गंभीर परिस्थितीमुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी जरी खूप मेहनत घेऊन शेती केली आहे तरीही शेतमजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. टाळेबंदीमुळे रब्बी पिकाचा हंगाम रोडावला आहे तसेच मालवाहतूक आणि सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शेती कोणतीही असो जरी ती फळशेती असो फुलशेती असो किंवा भाजीपालाशेती यांसारख्या नाशवंत पिकांचे उत्पादक खूप मोठ्या प्रमाणात तोट्यात गेले आहेत. त्या मालाला उठाव नसल्याने हाती असलेला माल शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.
शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या गंभीर परिस्थितीचा फायदा अनेक दलाल तसेच काही लोक घेत आहे. आलेल्या या परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा स्वीकारले आहे आणि स्वतः कडचा माल कमी पैशांमध्ये विकला आहे. सत्य परिस्थिती उदाहरणं: नाशिक मध्ये एका शेतकऱ्याने संपूर्ण द्राक्षाची बाग नुकसान पत्करून अगदी कमी पैशात त्याची विक्री केली तसेच एका ग्रामीण भागात एका शेतकऱ्याने त्याची झेंडूच्या फुलांची बाग अगदी कवडीमोल भावात देऊन टाकली आणि स्वतःचा उदरनिर्वाह त्या पैशांत करायचा ठरवले. अशा या गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत केंद्र सरकार यांकडून शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या योजनाही ठप्प झालेल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या पायाखालील जमीन सरकून त्यांच्या मनाचे खच्चीकरणं फार मोठया प्रमाणावर झालेले आहे.
महाराष्ट्रात कोरोना रोगाने जास्तच थैमान माजवले आणि रोगसंख्याही फार झपाट्याने वाढवली आणि यामुळे राज्यात फार भीतीचे वातावरण पसरलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील एका ठिकाणी तर एक आश्चर्यजनक घटना घडली ती म्हणजे एका पोल्ट्री मालकाने घाबरून त्याच्या पोल्ट्रीतील शेकडोंच्यावर कोंबडिंची कत्तल करून त्यांना जमिनीत गाडले. खूपच भयानक असा हा प्रकार महाराष्ट्र राज्यात घडला. त्या पोल्ट्री मालकाने रोगाचे प्रमाण वाढेल या एका भीतीने त्या कोंबड्यांची कत्तल केली आणि स्वतःच्या धंद्यावर पाणी फिरवले.
टाळेबंदीमुळे अनेक मार्ग बंद पडलेले आहे. सागरी वाहतूक, हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, व्यापार निर्बंध, सरकारी नियम आणि अटी, या सर्व गोष्टींमुळे निर्यात करताना खूप मोठे अडथळे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे निर्यात व्यापार देखील काही प्रमाणात ठप्प झालेले आहे. स्थानिक बाजारपेठेत देखील सर्व व्यापारांना नुकसान सोसावे लागलेले आहे. कोरोनामुळे आयात आणि निर्यात व्यापारावर जास्तच बंधने असल्याने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक बाजारपेठेत फारच मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट आलेले आहे आणि याचा दुष्परिणाम मोठ्या व्यापाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांवर झालेला आहे.
भारतातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी सावकारांकडून व्याजाने कर्ज घेतली आणि शेती केली आहे. पण या भीषण महामारिच्या साम्राज्यात शेतकऱ्यांना अनेक प्रसंगातून जावे लागले आहे तसेच खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान पत्करून विक्री करावी लागली आणि यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज फेडायला फार कठीण झालेले आहे. त्यांचे कर्जाचे हफ्ते थकले यामुळेच काही शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी सावकाराकडे गहाण ठेवल्या होत्या त्यावर सावकारांनी आता कब्जा केला आहे. आणि या कारणामुळे सर्व शेतकरीवर्ग फार चिंताजनक आणि निराश झालेला आहे.
केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने टाळेबंदीच्या काही दिवसांनी काही नियम शिथिल केले आणि व्यापार व उद्योगधंद्यांना पुन्हा एकदा चालना मिळून ते सुरळीत चालावे याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने काही प्रमाणात शेतकऱ्यांसाठी राखीव योजना राबवल्या पण त्या शेवटच्या तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नव्हत्या आणि बहुतांश शेतकरी सरकारच्या या योजना आणि मदतीपासून वंचित राहिले आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांचा उदरनिर्वाह स्वतःच्या पायावर केला तर काहींनी स्थानिक सामाजिक संस्थाकडून मदत घ्यायचे ठरवले आहे.
स्थानिक सामाजिक संस्थांनी शेतकऱ्यांना फार मोलाची मदत केली त्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यांना कोरोना परिस्थितीत एक माणुसकीचा आणि सामाजिक पाठिंब्याचा आधार दिला आहे. शेतकऱ्यांचे शिक्षण कमी असल्याने सामाजिक संस्थांनी त्यांना योग्य आणि अचूक माहिती दिली आहे. कोरोना म्हणजे काय...? तो कसा होतो...? आपण घ्यायची काळजी...?? शेतीवर आलेले संकट....?? शेती करून त्याची विक्री कशी करायची...??? आलेल्या संकटातुन पर्यायी उपलब्ध असलेले मार्ग....?? सरकारने राबवलेल्या योजना....?? त्या योजनेचा वापर कसा केला जातो...?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामाजिक संस्थातील सुशिक्षित तरुण आणि समाजसेवकांनी शेतकऱ्यांना केली आहे.
करोनामुळे शेतकरी आणि शेतमजूर या दोघांनाही फार मोठा फटका बसलेला आहे. अशा या भीषण परिस्थितीत अनेक शेतमजूरांनी त्यांच्या गावाला आणि स्थानिक रहिवाशी ठिकाणीच स्थलांतरीत व्हायचे ठरवले. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी फार अडचण आली तसेच शेतमजूरांचा रोजगारही बुडाला. या अशा प्रसंगात शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचेही आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहे.
सध्याच्या काळात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीची मर्यादा सरकारला वाढवावी लागेल. सावकारांकडून पैसे घेण्या ऐवजी, शेतकऱ्यांना कृषीकर्ज कमी व्याजदराने दिले पाहिजे तसेच तूर्तास काही दिवसांसाठी कर्जाचे हफ्ते शिथिल करावयास हवे, शेतकऱ्यांना रोजगार हमी दिली पाहिजे तसेच त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे व्यवहार सुरळीत करता येईलच आणि त्यांचे जनजीवन पुन्हा एकदा सुरळीत पूर्वपदावर येऊ शकेल.
*संपूर्ण नाव: श्री. भूषण सहदेव तांबे.*
*संपूर्ण सविस्तर पत्ता: 101/बी विंग, पारसमनी अपार्टमेंट, यादव नगर, बदलापूर - पिनकोड नंबर 421503*
*मोबाईलनंबर: 9029258038*
*ईमेल: bhushantambe88@gmail.com*
प्रतिक्रिया
खूप छान विचार आपण लेख
खूप छान विचार आपण लेख स्वरूपात मांडले त्याबद्दल खरंच कौतुक. शब्दालंकारातून आपण खूप छान व्यक्त झालात.
आपण दिलेल्या प्रतिक्रिये
आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल आभारी आहे सरजी.
अप्रतिम लिखाण आणि माहिती. खूप
अप्रतिम लिखाण आणि माहिती. खूप छान.
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल
आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार.
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
कवितेची बाराखडी आणि सौंदर्य शास्त्र
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण