Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



जीवाभावाचा पाखर्या

लेखनप्रकार: 
गद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
कथा

#जीवाभावाचा पाखर्या *
ऐन जून महिन्यात काल दुपारी नेडव्याला लावलेलं पाणी संपवून घरी परतत होतो. वाडीच्या वाटेवर एक तरुण आपल्या खोंडाला पळवून तालम देत होता. तालीम पहाताना बालपणीच्या आठवणीत हरवून गेलो.
लहानपणी शेतात जायचा संबंध सुगीला मळणीला, ऊसतोड आल्यावर जेवण द्यायला, हारभरा, भुईमूग राकायला यायचा. किंवा चुलत्यांच्या  एक्का बैलगाडीत बसून हौसेने भोंम पोर्णिमेला, बेंदराला, सांजिर्बाला नैवद्य दाखवायला जायचो. भावई ऊत्सवाच्या वेळी जेव्हा येळावीच्या लोकांनी आमणापूरामध्ये येवून त्या जोगणीच्या हातातील सांजी असलेला मातीचा हुंडा पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आमणापूरमधील लोकांनी त्याचा घोड्यावरून पाठलाग केला. व तलवारीने हात तोडला. त्याचा सांजी असणारा हात जीथे पडला तिथे हे सांजिर्बा तयार झाल्याचे जाणते लोक सांगतात. मुळात आमणापूर मध्ये हा भावई उत्सव असाच शेजारच्या बुर्ली गावातून पाच पिढ्यांच्या मागे सांजीचा उंडा पळवून आणल्यावर सुरू झालाय.
सांजिर्बाचे नेमका उदय सांगणे अवघड आहे पण त्याची आठवण सणावाराला आपल्या शेतांचा राखनकर्ता देव म्हणून नक्की काढली जाते.
तर सणावाराला बैलगाडीतून पाखर्या बैलाला नुसती हाक देवूसत्वर आवकास तो ताणतच आम्हाला शेताकडे घेवून जायचा.
पाखर्या अतिशय धिप्पाड देखणा बैल सगळ्या गावाची नजर त्याच्यावर . कारण त्याला गावात जोड नव्हता. उडीद याल खावून टणाटण उड्या मारत झेपा टाकत गाडी शेतात न्यायचा.पाढंराशुभ्र, लाल टांग्याने रंगवलेला टोकदार शिंगाचा पाखर्या देखता क्षणी नजरेत भरायचा. आम्हा सर्व भावंडाचा त्याच्यावर खुप जीव. शाळेस्नं घरी आली की कधी एकदा दप्तर पाटी टाकतोय. अन् एकदा छपरात जावून पाखर्याला भेटतोय अस व्हायचं. छपरात जावून वैरणीच्या बिंड्यातली गवताची कवळीलुस मुठ उचलायची दावणीत पाखर्या समोर उभा राहून त्याला चारायची. तो ती माझ्या हातची वैरणीची मुठ खाताना माझ्या आनंदाला पारावर उरायचा नाही. छपरातली बाकीची जणावरं हंबरडा फोडायची.
पण मी त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नव्हतो.फक्त त्याला चारता चारता दुसर्या हाताने त्याच्या मऊशार अंगावरून हात फिरवून पाखर्याला गोंजरत राहायचो. त्याच अंग जरा जरी गरम लागलं त्याने वैरण नाही खाल्ली तर मग रात्री झोपतानाही पाखर्या आजारी आहे या विचाराने झोप यायची नाही.
पाखर्यावर घरादाराच प्रेम. सकाळी उजडायला  मधला चुलतभाऊ आण्णा पाखर्याला कृष्णा नदीवर नेवून पवणी पाडून स्वच्छ चकचकीत धुवून आणायचा त्याला हाताच्या फोडावाणी जपायचा.
थोरला चुलतभाऊ बापुनं  लहान गोंडस खोंड  जतच्या मित्राकडून आणला होता.तो बघता बघता कधी लहानाचा मोठा झाला कळलच नाही.  बापूने त्याला पेंडीचा खुराक लावलेला.. कणकीचे गोळे करून चारायचा. संध्याकाळी बनाच्या वाटला नेवून आण्णा बापू त्याला पावंडान चालायची पळायची तालीम द्यायचे.सणावाराची पहिली पोळी घेऊन उषाताई, सुरकाताई त्याला गोठ्यात नेऊन चारायची. त्याच्या बाजूच शेणघाण उचलून नेहमी गोठा साफ ठेवायच्या.
त्याला नितनेमानं पाणी दावायच्या.
असं दिवसेंदिवस पाखर्या सार्या घरादाराचा जीव की प्राण झाला.
अचानक एका संध्याकाळी बांधकरी घरी आलेला. येताना सोबत एका जनावरांचा व्यापार करणाऱ्या हेड्याला सोबत घेऊन आलेला.
तेव्हा बांधकर्याच आमच्या शेताला पाणी होत. कधी वेळेत मिळत नव्हते. पण नाईलाज होता.
मी दरवाज्यात उभा राहून त्या पांढऱ्या जाडजूड मिशा असणार्या काळ्या माणसाला बघत होतो. धोतर नेसलेला हा मोठ्या डोळ्याचा माणूस मला आपल्या अंगणातल्या कटट्यावर बसलेला आजीबात आवडला नव्हता.त्याला दादा असं काहीतरी म्हणत होते बांधकरी. ताईच लग्न झालेलं. घरात पैशाची तंगीच होती. शैतात ऊस डोलत होता. पण तो कारखान्यात जाऊन ऊसाच बील येऊ पर्यंत नड मोठी होती. आमच्या सोन्यासारख्या जमीनीवरही अनेकांची वाकडी नजर होती.
अशातच बांधकरी पाणपट्टी मागयला आलेले. तेही सोबत हेडी घेऊन. त्यांच्यात काय बोलणं झालं काय माहीत.
दुसर्या दिवशी शनिवार सकाळी लवकर उटून आवरून गोट्यात रवंथ करत बसलेल्या पाखर्याला टाटा करत मी सकाळच्या शाळेला निघून गेलो. का कुणास ठाऊक त्या दिवशी वर्गात शिकवणार्या बाईंकडे लक्षच नव्हते.बाईनी मला हटकलही. एक दोनदा खडूही माझ्या दिशेने फेकला. पण माझ्या डोक्यात काही भलतच होत. माझ्या समोर घोंगावत होता रात्री आलेला तो पांढर्या मिशाचा काळा माणूस. कधी  शाळा सुटल्याची घंटा वाजली समजलच नाही. माझा लंगोटी यार सुधिरनं मला ओढतच वर्गाबाहेर नेलं. मला शाळा सुटल्याच भानच नव्हत. सुधिरबरोबर चालत घराकडे निघालो. वाटत कुंभाराच्या आव्या जवळ वैरणीने भरलेली बैलगाडी सोडलेली. आज इतक्या लांब का बैलगाडी सोडली आपल्या परड्यापस्न? आस म्हणत मी त्यातली वैरणीची एक मुठ पाखर्यासाठी उचलून छपराकडे गेलो. छपरात पाखर्याची दावण मोकळी दिसली. तस आपसुकच माझ्या डोळतनं पाणी घरंगळायला लागलं. पाखर्या म्हणून हंबरडा फोडत त्या छपरातच घडाघडा लोळायला लोगलो. आई दिसताच आईला उठून मिठी मारली.
पाखर्या कुठाय आई ? माझा पाखर्या...
© संदीप नाझरे, /9766689433
आमणापूर, ता. पलूस. जि. सांगली
__________________________

Share

प्रतिक्रिया