नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पीकपाणी
इथे ना कुणाचे खरे पीकपाणी
चुकार्या विना हे झुरे पीकपाणी
घबाडे,वाशिला,लबाडी मुजोरी
लफ़ंगेच घेती बरे पीकपाणी
कुठे फ़ास कोठे विषाची पुडी अन्
कुठे खुपसलेले सुरे पीकपाणी
अम्ही रक्त ओकू,अम्ही घाम गाळू
जरी पोट अमुचे चिरे पीकपाणी
कशी सोडवू ती गहाणे जुगारी
घराची निलामी करे पीकपाणी
जयाचे पुढारी तया योजनाही
तयाचेच पाणी भरे पीकपाणी
- प्रफ़ुल भुजाडे
चांदस-वाठोडा
ता.वरुड, अमरावती
-------------------------
प्रतिक्रिया
सुरेख गझल
सुरेख गझल.
शेतकरी तितुका एक एक!
पीकपाणी
कैफियत मांडणारी छान गझल.
हेमंत साळुंके
क्या बात है ......
अप्रतिम....
पाने