![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बळी तो कान पिळी किंवा मोठे मासे लहान मास्याला गिळतात, यासारख्या म्हणी बर्याचदा ऐकायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास शेतात चक्क एक भला मोठा विषारी नाग एका बिनविषारी सापाला गिळताना बघायला मिळाला.
एक अतिजहाल विषारी गव्हाळ्या नाग एका बिनविषारी लांबलचक धामण जातीच्या सापाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. गव्हाळ्या नाग कात टाकण्याच्या अवस्थेत (कोषी आल्याने) त्याची हालचाल बरीच मंद होती. बिळातून २ फ़ूट बाहेर तोंड काढून त्याने आपले भक्ष पकडलेले होते. धामण बरीच लांबलचक असल्याने नागाला सहजासहजी आपले भक्ष्य गिळंकृत करता येत नव्हते. लढत काट्याची होईल असे स्पष्ट जाणवत होते.
छायाचित्र घेण्यासाठी हवी तशी जागा उपलब्ध नसल्याने हवा तसा फ़ोटो मोबाईलने घेता आला नाही.
शिवाय मला अन्य कामासाठी शेत सोडून जायचे असल्याने पुढे काय झाले ते पाहता आले नाही.