नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
(८८८८)
••• गोठा •••
कौलारू घर गावाकडचे वृक्ष वडाचा समोर मोठा
तिथेच दिसतो जनावरांना आवडणारा त्यांचा गोठा
सुंदर काळी गाय शोभते कृष्णा आहे नाव सखीचे
डोळ्यांमध्ये करुणा इतकी यथार्थ वाटे नाव नदीचे
तांबुस रंगी गौरी दिसते डौलदार अन् पुरती धाकट
तिचे वासरू जरा वेगळे थोडे पांढर थोडे पिंगट
शंभू याचे नाव ठेवले उनाड आहे फार भयंकर
जागेवरती उड्या मारतो पळण्यासाठी सदैव तत्पर
कृष्णेची ती कपिला थोडी शांत वाटते थोडी चंचल
हिरवा हिरवा चारा दिसता ती ही होते बरीच अवखळ
शुभ्र पांढरे सर्जा राजा परिवाराची शान वाढवी
डौल निराळा दोघांचाही रुबाब माझ्या मना मोहवी
कोपऱ्यातली म्हैस बिचारी नाव तिचे मी 'हिरा' ठेवले
'हिरा' ऐकुनी मान वळवते *नाव तिला हे* जणू भावले
गोठ्यामध्ये येतो जातो मोती कुत्रा लुडबुड करतो
प्रेम जिव्हाळा कुटूंब वैभव विण नात्यांची घट्ट बांधतो
©रोहिणी पांडे,नांदेड
Mob.9518749175
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.