नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०२३
*खांड*
शेंग शेंग वेचूनिया
डहाळे केलीत गोळा
रास सुखाची येईल
माझा ओलावला डोळा
स्वप्न पापणीत येता
हात आगाशाला गेले
दोन थेब ओंजळीत
आशिष घेवून आले
पाय लागले कामाला
हेडंबा भेटला नाही
आता शेतीच्या कामाला
कोणापाशी वेळ नाही
मग अस्सा आला वारा
आला पाऊसपाणी
उभ्या रचिल्या खांडाची
दाटली डोळ्यात हानी.
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिक्रिया
खांड
*खांड*
शेंग शेंग वेचूनिया
डहाळे केलीत गोळा
रास सुखाची येईल
माझा ओलावला डोळा
स्वप्न पापणीत येता
हात आगाशाला गेले
दोन थेब ओंजळीत
आशिष घेवून आले
पाय लागले कामाला
हेडंबा भेटला नाही
आता शेतीच्या कामाला
कोणापाशी वेळ नाही
मग अस्सा आला वारा
आला पाऊसपाणी
उभ्या रचिल्या खांडाची
दाटली डोळ्यात हानी.
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने