नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मातृप्रेम
भरल्या बाजारात, मी का हिंडते चारी वेशी,
बया वाचुनी, हट्ट करू मी कुणापाशी.
आईचा उपकार, कसा फेडू मी सांगा देवा,
करी मांडीचा चवरंग, नेत्राचा केला दिवा.
जीवाला जड भारी, कसं कळालं हरणीला ,
बया माज्या ग माऊलीचा, पाय थरेना धरणीला.
जीवाला माज्या जड ,शेजी बघती वाकुनी,
माजी ती बयाबाई, आली कामधंदा टाकुनी.
पाटच्या पाऱ्यामंदी, तोंड पाहिलं कुणायाचं,
माज्या त्या माऊलीचं, जन्म दिलेल्या आईचं.
-------------------------------------------------------
प्रतिक्रिया
फारच सुंदर आहे हे गीत. हा
फारच सुंदर आहे हे गीत.
हा ठेवा जपून जतन करायलाच हवा.
बया हे कुणाला उद्देशून आहे? आईला काय?
थरेना चा अर्थ ठहरेना, थांबेना असा आहे काय?
शेजी म्हणजे शेजारीन ना?
पाटच्या पाऱ्यामंदी हा शब्द बरेच दिवसापासून ऐकत आहे. अर्थ काय आहे नाही माहीत.
वरील ओवीत आरसा असावा, असे वाटते.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
नमस्ते सर,
बया म्हणजे आई हा ग्रामीण शब्द आहे. थरेना म्हणजे थांबेना.शेजी म्हणजे शेजारीन.पाटच्या पाऱ्यामंदी म्हणजे पहाटेच्या प्रहरी.
ही फार जुनी ग्रामीन भाशा आहे.
पाने