Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



श्रमाच्या शोषणाचा श्रीगणेशा : करोना माहात्म्य ||८||

करोना माहात्म्य ||८||
 श्रमाच्या शोषणाचा श्रीगणेशा
 
        जिथला मनुष्य तिथे थांबला असता तर करोना संक्रमणचक्र खंडित व्हायला 28 दिवस लॉकडाऊन पुरेसे ठरले असते. पण इकडचा माणूस तिकडे व तिकडचा माणूस इकडे अशी ये-जा सुरूच राहिल्याने ५० दिवसाचा लॉकडाऊन व्यर्थ गेला आहे. जरी रुग्णसंख्येची गती मंदावली व आपण तिसऱ्या स्टेजवर पोचलो नसलो तरी आता लॉकडाऊन संपले किंवा शिथिल झाले तर  रुग्णाची गती गुणाकाराच्या पटीत वाढेल, हे उघड आहे. आता जास्त काळ लॉकडाऊन काळ वाढवता ठेवणे आज ना उद्या अशक्य होईल. लॉकडाऊन शिथिल केल्यास ते प्रभावहीन ठरत असून फक्त आजचे मरण उद्यावर ढकलणे, इतकेच साध्य होत आहे.
 
        "करोना आपत्तीकालीन लॉकडाऊन" म्हणजे काय, हेच अनेकांना कळलेले नाही. त्यामुळे घाऊक प्रमाणात स्थलांतराला खतपाणी घालण्याचे काम बुद्धिवाद्यांकडून झाले आणि होत आहे. लॉकडाऊन म्हणजे "जिथला मनुष्य तिथे" इतका सोपी अर्थ असताना इतका कोलाहल का माजावा, हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे. जिथे आहे तिथेच मजुरांना थांबवण्यासाठी सर्व समाजाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे होते. त्यांना तिथेच थांबवून त्यांची भोजनाची व निवासाची व्यवस्था करणे शक्य होते पण लोकांना केवळ पुळका दाटून आला. गरिबांबद्दल अथवा मजूर कामगारांबद्दल ओसंडून वाहणारा इतका प्रचंड पुळका यापूर्वी मी कधीही पाहिला नव्हता. एकदम माणसे माणूसकीत वगैरे आल्यावाणी अचानकच दिसायला लागली. मात्र ही सारी पुळकेबाज मंडळी निव्वळ बोलघेवडी निघाल्याने मजुरांचे खाण्यापिण्याचे वांदे कायमच्या कायमच राहिले. 
 
        गरिबांबद्दल पुळका दाखवणारे करोडो लोक देशात पावलोपावली दिसत असताना मजुरांचा भुकेचा प्रश्न सहज मिटायला हवा होता पण मनुष्य ढोंगी असेल तर त्याचा पुळका सुद्धा ढोंगीच असतो. मला परिचित व मला माहित असलेल्या निदान लाख लोकांचे मागील ४० वर्षाचे रेकॉर्ड माझे मेंदूत साठवून आहेत. त्या चाळीस वर्षात कुणाला किती कळवळा होता हे इतका प्रदीर्घ काळ जवळून बघितले आहे. त्यामुळे सध्या गरीबाविषयी जो पुळका दाखवला जात आहे, ते निव्वळ ढोंग आहे, असा माझा निष्कर्ष आहे. ही मंडळी इकडे पायपीट करणाऱ्या मजुरांसाठी अश्रू ढाळत असताना तिकडे अनेक राज्य सरकारांनी कामगार कायद्यात हेराफेरी करून कामगारांचे आजवरचे न्यायिक हक्क हिरावून घेतले आहे.
 
        उद्योगधंद्यांना पुन्हा एकदा चालना देण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी हातघाईवर येत श्रम कायद्यातच बदल करण्याचा सपाटा लावला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा आणि गोवा या राज्यासहित अनेक राज्यांनी आपल्या राज्यात नव्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी श्रम कायद्यात बदल जाहीर केले आहेत. या बदलांमुळे श्रमिकांचं शोषण आणि अन्याय वाढणार आहेत. औद्योगिक वाद सोडवणूक, व्यावसायिक सुरक्षा, श्रमिकांचं आरोग्य आणि काम करण्याच्या स्थितीसंबंधी सर्व कायदे स्थगित करण्यात आलेत. ट्रेड युनियनला मान्यता देणारा कायदाही पायदळी तुडवण्यात आला आहे. कॉन्ट्रक्ट श्रमिक आणि प्रवासी मजुरांसंबंधित कायदे समाप्त करण्यात आल्याने आता नवीन बदल नव्या आणि सद्य दोन्ही उद्योगांना लागू होणार आहेत. सर्व कारख्यान्यांत काम करण्याची वेळ ८ तासांवरून १२ तास आणि आठवड्यात ७२ तासांच्या ओव्हरटाईमलाही मंजुरी देण्यात आली आहे. श्रमिकांवर करण्यात आलेल्या कारवाईत श्रम विभाग आणि श्रम न्यायालयाचा हस्तक्षेपही रोखण्यात आला असल्याने मजूर कामगारांच्या मूलभूत हक्कावरच गदा आली आहे. 
 
        शेकडो किलोमीटर पायपीट करत चालणाऱ्या मजुरांच्या अवस्थेवर ढसाढसा रडणारे बुद्धिजीवी कामगार कायदा बदलाच्या निर्णयावर अवाक्षरही बोलले नाहीत, बोलणार नाहीत. कारण बुद्धिजीवी लोक आपापले इसिप्त साध्य करण्यासाठी व आपापला छुपा एजेंडा रेटण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांचे किंवा गरिबांचे नाव पुढे करत असतात. हा बुद्धिजीवी लोकांचा पूर्वापार चालत आलेला कपटनीतीचा कुटिलडाव असतो पण हा डाव शेतकरी, मजूर, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या कधीच लक्षात येत नसल्याने ते अशा जाळ्यात बेमालूमपणे फसतात व आपलाच आत्मघात करून घेतात. आमचे मित्र श्री सुधीर बिंदू यांनी महिनाभरापूर्वीच भाकीत केले होते की औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या नावाखाली कोरोना पश्चात काळात शेतीचे आणखी तीव्र गतीने शोषण करण्याचे छडयंत्र रचले जाईल. हे भाकीत खरे ठरल्याचे लवकरच पाहायला मिळेल, असा अंदाज आजतरी दिसतोय.  आज कामगारावर-मजुरांवर कुऱ्हाड कोसळली. पुढले लक्ष्य शेतीच असणार हे स्पष्ट दिसत आहे.
 
        कोरोनाचे संकट जेमतेम प्राथमिक अवस्थेत आहे. पुढचा काळ कसा असेल हे सांगणे अवघड आहे. सुरवातीचे २८ दिवस जरी प्रत्येक भारतीयाने आपापले राजकारण खुंटीला लटकावून ठेवले असते तर पहिल्या २८ दिवसातच करोना संक्रमणचक्र खंडित होऊ शकले असते. व नंतरच्या काळात फक्त "हॉटस्पॉट" एरियात कोरोनाला बंदिस्त करणे सहज शक्य झाले असते. सध्याच्या स्थितीत करोनावर नियंत्रण मिळवायला केवळ लॉकडाऊन हाच एकमेव प्रभावी इलाज आहे. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व उपाय जवळजवळ अंधश्रद्धेच्या पातळीचेच आहेत.
 
        करोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर देशभरात बंदुकीच्या नळीवर कडाक्याचा २८ दिवसाचा लॉकडाऊन पाळावा लागेल. तरच कोरोना विषाणूचे संक्रमणचक्र खंडित करणे शक्य होईल अन्यथा भारतीय माणसाची वर्तणूक व विचारशैली लक्षात घेता कोरोना ८०-९० कोटी लोकांची तरी पप्पी नक्कीच घेईल, असा माझा प्रथमदर्शनी अंदाज आहे. देव लवकरात लवकर भारतीयांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना करण्यापलीकडे दुसरा पर्याय सध्या मला तरी दिसत नाहीये.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
दि. १२/०५/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
 
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.

 

करोना

Share