Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




काही सुटे अन काही मुटे शेर

काही सुटे अन काही मुटे शेर

तू कोसळ मुसळधार, जशी हवी तशी, कुठेही, कशीही
मी ओढ्याच्या रुपात, सावरेन तुला, बाहूत घेऊन

© गंगाधर मुटे १७/०७/१९ #थेट_बांधावरून
=-=-=-=-=
कशासाठी विचारावे की पक्ष तुझा कोणता
तुझे कूळच तर सांगते की पक्ष तुझा कोणता
 
© गंगाधर मुटे #माझी_वाङ्मयशेती #लोकशाही #पचायला_अवघड_डोज
 

=-=-=-=-=

येते कधी कधी पण; सांगून येत नाही
इतक्याच कारणाने संधी कवेत नाही
 
मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
मम वाट रोखणारा वारा सचेत नाही
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
साम-दामाविना जन्म व्यर्थ आहे, नर्क आहे?
लोकशाहीस इतुकाच अर्थ आहे? तर्क आहे!
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
प्रश्न हा नाहीच की आता प्रश्नच बाकी नाही
प्रश्नच प्रश्न सोडले तर प्रश्नच बाकी नाही
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
धुंदलेल्या वादळाला तू असे अडवू नये रे
तप्त झाल्या भावनेची तू नशा चढवून ये रे
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो
 
तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो
 
- गंगाधर मुटे 'अभय’
=-=-=-=-=
 
जगामध्ये चमकायला अक्कल पहिजे
अक्कल नसेल तर निदान टक्कल पाहिजे
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
ऐकताना कान त्यांनी झाकले अन्
बोलले तेही जणू उपकार केले
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
जरी हे खरे की रसिकामध्ये प्राविण्य पाहिजे
परंतु; कविते तुझ्यातही थोडे नाविण्य पाहिजे
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
ती किंचाळली तेव्हा रात्र निजली होती
जागी होईस्तोवर पहाट भिजली होती
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
झोपेमध्ये असतो तेव्हा मनिषा जागत असते
उघड्या माझ्या जखमांवरती फ़ुंकर घालत असते
 
जिथे श्रमाने दमल्यावरती बुद्धी लोळण घेते
घट्ट धरोनी तिथे मनाला उमेद धावत असते
 
- गंगाधर मुटे ’अभय’
 
=-=-=-=-=
 
न गरजतो, न बरसतो, नुसताच रिमझिमतोय
हा पाऊसच आहे की पुणेरी माणूस?
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
निर्ढावल्या नभाशी खेटून ठाकला तो
भांबावल्या दिशांना आधार वाटला तो
 
गगनात एक पक्षी ललकारतो हवेला
आभाळ पेलण्याच्या स्वप्नात गुंतला तो
 
अदृश्य एक वारा, असतो सदा सवेला
बघता उदास मुखडा, गोंजारतो मला तो
 
- गंगाधर मुटे ’अभय’
=-=-=-=-=
 
कुणी रेटून जात आहे, कुणी खेटून जात आहे
उरले-सुरले उगवतीचा गर्भ तुडवून जात आहे
 
फायद्याचा दिसतो सौदा तोपर्यंत ... तोपर्यंतच
पुढे पुढे मिरवतो त्याची तो स्वत:हून जात आहे
 
- गंगाधर मुटे
=-=-=-=-=
 
चंद्राळतो जणू मी दिसताच मित्र माझा
बरसात चांदव्याची करताच मित्र माझा
 
-गंगाधर मुटे "अभय"
=-=-=-=-=
Share

प्रतिक्रिया

  • admin's picture
    admin
    रवी, 17/07/2022 - 11:19. वाजता प्रकाशित केले.
    कवी शेती करत नाही
    केली तर पिकत नाही
    पिकली तर विकत नाही
    विकली तर भाव नाही
     
    भाव नाही तर नाव नाही
    नाव नाही तर पत नाही
    पत नाही तर प्रतिष्ठा नाही

     

    मग तो शेतीशी द्रोह करून
    राजाश्रय घेतो
    आणि पेश करू लागतो
    एकसे बढकर एक
    अप्रतिम, भन्नाट
    शोषकांना पोषक अशा
    पोटभरू कवितांचा
    नजराणा.....!!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    रवी, 25/02/2024 - 12:20. वाजता प्रकाशित केले.
    कुणाचे कुणाला कळेनाच काही 
    सभा होय ही की असे मद्यशाळा

    © गंगाधर मुटे २५/०२/२०२४ #थेट_बांधावरून

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 16/03/2024 - 18:22. वाजता प्रकाशित केले.

    गारपिटीच्या अंगसंगाने गर्भपातल्या रानी
    अश्रू होऊन हवेत विरले पाटामधले पाणी

    . - गंगाधर मुटे ’’अभय”

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:04. वाजता प्रकाशित केले.

    तपवून शब्दधारा मग शब्दयज्ञ केला
    बघताच शब्दाशक्ती जळ लागले जळाया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:05. वाजता प्रकाशित केले.

    काही हशील नाही जागे करून आता
    मरणार हे तसेही खंगून जीर्ण काया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:06. वाजता प्रकाशित केले.

    स्वस्तात मागते जी आलू , लसूण, कांदा
    तीही तयार नाही अजिबात 'भाव' द्याया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:07. वाजता प्रकाशित केले.

    सत्यापरीस वरचढ झालीय लोभमाया
    कोणी तयार नाही सोज्वळ साक्ष द्याया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:08. वाजता प्रकाशित केले.

    आयुष्य थोडके अन् गंतव्य लांब आहे
    होणार साध्य काही की जाणार जन्म वाया?

    #गंगाधर_मुटे #शुभरात्री_लोक्सहो #रानातला_शेर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:10. वाजता प्रकाशित केले.

    मी हारलो युगात्म्या वस्तीत पांगळ्यांच्या
    बसलो उगीच होतो आयुध तुझे विकाया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:11. वाजता प्रकाशित केले.

    लाचार एक झाले, घनघोर बंड केले
    घडले असे कधी तर कळवा मला कळाया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    गुरू, 03/10/2024 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

    उत्तेजना अशी तू देऊ नकोस वाऱ्या
    मी पंख कापले बघ, माझ्यात मी स्थिराया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 07/10/2024 - 19:13. वाजता प्रकाशित केले.

    गोंजारल्या भुकेला लाडात पोसले तर
    दिसताच कंच चारा अक्कल निघे चराया

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    सोम, 09/12/2024 - 21:11. वाजता प्रकाशित केले.

    कधीतरी आपल्याच आत झाकून बघू
    गरिबी का आली ते तरी शोधून बघू

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 05/07/2025 - 20:19. वाजता प्रकाशित केले.

    आयुष्य म्हणजे पेंडूलम, दोलायमानी मॅच असते
    कधी मीलरचा सिक्सर तर, कधी सूर्याची कॅच असते

    #गंगाधर_मुटे #रानातला_शेर

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 28/10/2025 - 20:39. वाजता प्रकाशित केले.

    मोह-मायेला कवटाळून बघावं म्हणतो
    आता थोडंस स्वतःसाठी जगावं म्हणतो

    - गंगाधर मुटे #शेर #शुभरात्री_लोक्सहो

    शेतकरी तितुका एक एक!

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    मंगळ, 28/10/2025 - 20:45. वाजता प्रकाशित केले.

    अस्तित्वाचे उभार खचले, मलूल असल्यावाणी
    जगण्या-मरण्या मधले अंतर, उरले नसल्यावाणी

    - गंगाधर मुटे

    काय करावे? पुढे जगावे? अथवा बस्स करावे?
    प्रश्नापोटी प्रश्न जन्मले, उत्तर फसल्यावाणी

    - गंगाधर मुटे

    शिकारबोड्या शब्दशराने, काळिज पाणी पाणी
    घाव विषारी घट्ट चिकटला, रुतून बसल्यावाणी

    - गंगाधर मुटे #रानातला_शेर

    प्रश्नामागून प्रश्नच प्रश्न, प्रश्नापुढेही प्रश्न
    प्रश्न पिडेचा जणू चंग हा, कंबर कसल्यावाणी

    - गंगाधर मुटे #रानातला_शेर

    शेतकरी तितुका एक एक!

  • पाने