
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्राचा शेतकरी..!!
	कारे देवा उशीर लवियेला
	पाण्यासाठी जीव वेडा झाला ।।१।।
	गळ्याला कोरड पडली, काळोखात रात्र दडली
	लाईट नाही आली, उशीर लावियेला ।।२।।
	जंगलांचा नाश यांनी केला, कळले नाही आम्हाला
	पाऊस नाही आला, उशीर लावियेला ।।३।।
	धरणी मातेचा कोप, आमच्यावर झाला
	आत्महतेने शेतकरी मेला, उशीर लावियेला ।।४।।
	सरकारला कीव नाही आली, मदत गायप झाली
	त्याने घोटाळ्यावर घोटाळा केला, उशीर लावियेला ।।५।।
	
	- अशोक बाबाराव देशमाने
	-------------------------------------------------------------------
