नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जिगरबाज शेतकरी
मी एक सामान्य नागरिक ,नोकरदार होतो. मी शेतकरी नाही, शेती केली नाही ,शेती पाहिली मात्र आहे.
लहानपण ते नोकरीतून स्वेच्छानिवृत होईपर्यंतचे आयुष्य मराठवाड्यातील ग्रामीण परिसरात गेले आहे.
जरी शहरात होतो -ते शहरे -म्हणजे ग्रामीण जीवनाची प्रभावी छाप असलेली होती ,त्यामुळे ग्रामीण जीवनमान
जवळून पाहण्यास मिळाले .
स्टेट बँक आफ हैदराबाद या नामवंत बँकेत मी ३३ वर्षे नोकरी केली - १९७३ ते २००६ -(स्वेच्छानिवृत्त होई पर्यंत).
या दशकांच्या काळात मी अंबाजोगाई ,जिंतूर, गंगाखेड ,परतूर , आणि परभणी अशा विविध ठिकाणी काम केले ,
माझ्या आठवणी प्रमाणे १९७० च्या दशकापासून सर्वच प्रमुख बँकांच्या कार्यपद्धतीत फारमोठा आणि क्रांतीकाराक असा बदल झाला ,कमर्शियल असलेल्या बँकांनी प्रथमच - "शेतीविषक -कर्ज पुरवठा करण्यास आरंभ झाला , आमच्या बँकेला मराठवाड्यात "हैद्राबाद बँक "या लोकप्रिय नावाने संबोधिले जाते ,१९७२ साली "कृषी विकास शाखा - जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु झाल्या -
परभणीच्या नवा मोंढा परिसरात आमच्या बँकेची कृषी विकास शाखा आहे" , १९८६ ते १९९६ अशी १० वर्षे मी या शाखेत काम करीत असतांना - शेती पाहिली , शेतकरी पाहिला ,त्याच्यात दडलेली व्यक्ती , वल्ली दोन्ही अगदी जवळून पाहिले .आज आठवणीतले ते दिवस तुमच्याशी शेअर करतांना डोळ्यासमोर ती माणसे जशीच्या तशी तरळत आहेत.
जवळपास ५० -५५ गावे बँकेने कर्ज-देण्या साठी दत्तक घेतली होती .
जास्तीत जास्त ३० कि,मी परिसरात रोडवर असलेली ही गावं होती. शेतीविषयक आणि इतर पूरक व्यवसाय -या साठी आमच्या शाखेतून कर्जवितरण केले जाते. १९८६ साली -आजच्या इतका वाहनाचा सुळसुळाट नव्हता -त्याची सुरुवात मात्र झाली होती. बहुतांशी गावोगावी रात्री मुक्क्मास थांबलेल्या एसटी सकाळीच निघायच्या , या पहिल्या एसटीने हे शेतकरी बँकेच्या कामाला निघायचे .
ही सगळी गाव मी आमच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या सोबत जाऊन पाहिली , या शेतकरी -मानसला खूप जवळून पाहिले -त्याच्या मनात डोकावलो, घरात फिरलो , सुखा पेक्षा त्याला दुखाची सोबत असते हे पण पाहिले ."चला साहेब, आपल वावर पाहून येऊ अदुगर - मग त्याच्या शेतात फिरून आलो , आंब्याच्या सावलीत घटका-दोन घटका पान-सुपारी पण झाली . दिवस वाईट आले तरी याचा जीव कधी कदरून गेला "असे तो कधीच दाखवत नसे.
गरिबी -दारिद्र्य - नशिबाचा भोग आहे आपला - त्याचा दिखावा तो कशापायी करायचा ? असा सवाल ऐकला की
गप्प बसून त्याचा करारी चेहरा नजरेत साठवून घेत असे.
ही माणसे भोळी होती , सगळीच अशी नव्हती - चालाख ,हजरजबाबी , आपला फायदा करून घेणारी , काही मदत करणारी ,नाना तर्हेची माणसे -शेतकऱ्याच्या रुपात वावरतांना पाहिली.
या माणसांना मी गोष्टी लिहिणारा आहे" ,हे माहित होते , ते म्हणयचे - तुमच्या समोर बोलायचे म्हणजे -काही खरे नसते बाबा - आमच्यावर स्टोरी लिहायचे तुम्ही " .मी हसण्यावारी नेत असे.
आपल्या कडे "शेती करणारे , आणि "शेती पहाणारे " असे दोन प्रकार आहेत. दुसरा प्रकार निव्वळ टाईमपास असतो."रिकामटेकडा "लेबल लागू नये म्हणून -सांगण्याची सोय - यंदा पासून आपल पोरग -पाहताय शेती",
म्हटल -बघ बापा , तुझीच आहे शेती .माज काय झाल आता ..!
शेती करणारे " मात्र खरोखर मेहनत करून निर्धारपूर्वक प्रगती करतात , गावाला ,घरा-दाराला नवी दिशा दाखवतात , अशा अनेक जिगरबाज शेतकऱ्यांनी आपली चुणूक दाखवली आहे.
२०-२५ वर्षापूर्वीचा निसर्गक्रम २०१३-२१०४ इतका बे-भरोसी नक्कीच नव्हता , एका वर्षाआड शेतीचा मौसम कधी बरा , कधी मध्यम असा बेतास बात असायचा . जून ते सप्टेंबर -हे तीन महिने आमच्या शाखेचा "कामाचा हंगाम"
कारण ७ जून पासून ज्या ज्या गावात पाउस सुरु व्हायचा -दुसरे दिवशी शेकडो कस्टमर -बँकेत हाजीर असत.
सकाळी आलेल्या या शेतकऱ्याच्या चेहेर्यावरून आम्ही " आवंदा हंगाम कसा असेल "? याचा अंदाज करायचो.
मी पाहिलेल्या शेतकर्यात - श्रीमंत शेतकरी , सुखवस्तू शेतकरी , मध्यम शेतकरी , सामन्य शेतकरी ,अतिसामान्य -शेतकरी , शेतमजूर , भूमिहीन शेतकरी , शेतीपूरक व्यवसाय करणारे असंख्य गाव्कारीबंधू " असे विविध प्रकार होते. सामान्य आणि अतिसामन्य शेतकरी -आणि शेतमजूर -ही मंडळी खर्या अर्थाने -अतिशय कठीण आयुष्य जगतात . .
माळकरी ,वारकरी , भोळे- भाबडे , सचोटीची स्वभाव वृत्ती असे शेतकरी सुरवातीच्या काळात "कर्ज घेणे " नामुष्की समजत असत , पुढे पुढे यात फरक पडला . आज नगद -कल उधार " या प्रमाणे - शेतकरी दरवर्षीच म्हणयचे -
काय कराव- गेल्या साली बर होत म्हणायचं -आवंदा काही ठीक दिसत नाही आमच ..!",
मी काम करीत असलेला एकूणच "इलाखा " तसा सधन -इलाखा "म्हणून ओळखला जातो , गोदेचा काठ लाभलेली अनेक गावे आमच्या कार्यक्षेत्रात होती. असे असले तरी -पाउस मेहरबान झाल्या शिवाय - शेती आणि शेतकऱ्यांचे काही खरे नसायचे . "कमी पाउस -उशिराचा पाउस - नगदी पिक -हातातून गेली की मात्र 'हा शेतकरी मित्र अगदी हातपाय गाळून बसायचा , त्याचे अवसान जायचे - कारण पैसा आला तर संसार -नसता हाता तोंडाची गाठ कशी बी पडल,पण, घरातील पोरा-बाळांचे कसे व्हायचे ?
मोंढ्यातील उलाढाल , साखर-कारखान्याचा हिशेब , कर्जाच्या पैश्याचा विनियोग -- या गोष्टी -शेतकऱ्याच्या मनाला अखंड यातना देणाऱ्या -
अडवणूक , छळवणूक, फसवणूक , पिळवणूक "किती प्रकार म्हणून सांगावेत - हे काही लपून थोडेच चालते ,अगदी उघड उघड -डोळ्या देखत चालणारे प्रकार - "शेतकरी सगळीकडून अगदी भरडला जातो" या वाक्याची प्रचीती घेतली नसेल असा माणूस असेल ?
हा शेतकरी -त्याच्या शेतीशी प्रामाणिक असतो. "जमिनीचा तुकडा -काळजाचा तुकडा असतो, अल्प -संतुष्ट असा हा सामन्य माणूस - आपल्या मगदुरी प्रमाणे जगतो आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती त्याला जगण्याचे बल देते.
पण दिवसागणिक बदलत जाणारा निसर्ग -त्याची अवकृपा , त्यासोबत स्वार्थी- आणि आत्मकेंद्रित माणसांनी निर्माण केलेल्या समस्यांनी या शेतकर्याचे कंबरडे मोडले आहे. यातूनच "आत्मघात करण्याची प्रवृत्ती जोर धरते आहे", सगळीकडून नगण्य गणलेल्या -या माणसाला सन्मानपूर्वक वागणूक देण्याची गरज आहे , खर म्हणजे "तो श्रेष्ठ असा देणारा आहे -दाता आहे - आणि इतर सगळे त्याच्या कडून घेणारे -याचक आहे" पण असे वास्तवात काहीच नाही - इतक्या काही अनिष्ट गोष्टी आहेत की - त्या दूर केल्या तरच -भले होणार अन्यथा --!
- अरुण वि.देशपांडे -पुणे
----------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
छान
मनान सदाच श्रीमंत हाय राजा.
हेमंत साळुंके
अभिनंदन.
अरुणजी, छान लिहा आहे. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
मी स्वतःही अभियंता असुन पुण्यातल्या अल्फा लवाल सारख्या बहुदेशीय कंपनीत प्रोडक्शन म्यानेजर या पदावर कार्यरत असताना आणि १४ वर्षाची नौकरी शिल्लक असताना तीन वर्षापूर्वी राजीनामा देऊन शेतीकडे वळलो आहे . अनेक चढ उतार पाहतो आहे.
http://maymrathi.blogspot.com/
पाने