नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

मातॄभक्त

हेमंत साळुंके's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
गझल

आताच मोड आले वापून यार हो
जावू नका तुम्ही ते जाळून यार हो

घेवून दूर गेला वारा ढगास कोठे
सारी जमीन गेली तापून यार हो

आले सफेद पक्षी गेले पुन्हा कुठे
ते आसवांस खोट्या ढाळून यार हो

ठेवून मज अडाणी जातात ते पुढे
मातीत जीव माझा गाढून यार हो

मातीस पोसणारा तो मातॄभक्त मी
बाकी कलेवरांना सोडून यार हो

हेमंत साळुंके,
लातूर, जि. लातूर

Share

Comments

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 04/11/2014 - 16:14. वाजता प्रकाशित केले.

    पाचही शेर बढिया!
    मातीची व्यथा चांगली हाताळली आहे.

    शेतकरी तितुका एक एक!


  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    Tue, 04/11/2014 - 17:23. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद सर,
    मी अजून नवीन आहे या क्षेत्रात माझी अजून एक गझल सदॄश्य रचना स्पर्धेस पाठवत आहे स्विकार व्हावा!

    हेमंत साळुंके


  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    Tue, 04/11/2014 - 20:12. वाजता प्रकाशित केले.

    मी पुढची गझल सदॄश्य रचना देवू का? मात्र मला भनभन नाय पायजे. मी माज्या मर्जीने लिवतो.

    हेमंत साळुंके


  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 04/11/2014 - 20:17. वाजता प्रकाशित केले.

    पुढची रचना अवश्य द्या.

    शेतकरी तितुका एक एक!


  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    Tue, 04/11/2014 - 20:21. वाजता प्रकाशित केले.

    आपल्या मातीप्रेमाला माझे नमन होते आणि आहे साहेब. रचना उद्या अनिश्चीत समयी सहभागी करेन विनम्र धन्यवाद....

    हेमंत साळुंके


  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    Mon, 10/11/2014 - 01:06. वाजता प्रकाशित केले.

    धन्यवाद.

    हेमंत साळुंके


  • Pages

Layout Settings