पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
इथून गेल्यावर
स्वप्नांचा दर्वळ मनातली हिरवळ एकांती हळहळ ... जपून ठेव
केलेली मजा भोगलेली सजा सर्वातली रजा ... जपून ठेव
आठवती क्षणं बावरती मनं विसरतं गाणं ... जपून ठेव
आनंद डोही घटीत काही सोबत हे ही ... जपून ठेव
घेतल्या ताना हलल्या माना नेमका बाणा ... जपून ठेव
आठवांचे घडे मोफतचे धडे कुठचे गडे .! ... जपून ठेव
ह्स्यातली खळखळ रुसव्याची जळजळ जपलेली चळवळ ... जपून ठेव
Gajanan Mule mulegajanan57@gmail.com
छान. सर्वातली रजा ... जपून ठेव - हे कळले नाही.
शेतकरी तितुका एक एक!
...... तेव्हा भरपूर मजा केली. कधी कधी त्याचा अतिरेकही व्हायचा त्यामुळे अर्थातच सजा मिळायची. या साऱ्या गदारोळातून कधीतरी निवांत रजा घेऊन ... एकट होऊन गप्प बसून स्वतःशीच संवाद साधला जायचा ....ते सारंही जपायला नको ? तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी ... आत्ता नक्की समजलं असेल तुम्हाला
तुम्ही संपाद्नासोबत परीक्षणही करता ... ते खरोखर मनापासून भावत चाललय, असो दिलेल्या प्रतिक्रियेला धन्यवाद लोभ असावा
गजानन मुळे
मी सुद्धा कवितेच्या क्षेत्रात अगदीच नवखा आहे. त्यामुळे मला परीक्षण वगैरे करता येत नाही. पण वाचल्यानंतर मनात जी प्रतिक्रिया उमटते, ती व्यक्त करण्याचा प्रयत्न असतो.
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
प्रतिक्रिया
छान. सर्वातली रजा ... जपून
छान.
सर्वातली रजा
... जपून ठेव - हे कळले नाही.
शेतकरी तितुका एक एक!
उत्तर
केलेली मजा
भोगलेली सजा
सर्वातली रजा
... जपून ठेव
...... तेव्हा भरपूर मजा केली. कधी कधी त्याचा अतिरेकही व्हायचा त्यामुळे अर्थातच सजा मिळायची. या साऱ्या गदारोळातून कधीतरी निवांत रजा घेऊन ... एकट होऊन गप्प बसून स्वतःशीच संवाद साधला जायचा ....ते सारंही जपायला नको ?
तुका म्हणे होय मनाशी संवाद
आपुलाची वाद आपणाशी ...
आत्ता नक्की समजलं असेल तुम्हाला
तुम्ही संपाद्नासोबत परीक्षणही करता ... ते खरोखर मनापासून भावत चाललय,
असो दिलेल्या प्रतिक्रियेला धन्यवाद
लोभ असावा
गजानन मुळे
मी सुद्धा कवितेच्या क्षेत्रात
मी सुद्धा कवितेच्या क्षेत्रात अगदीच नवखा आहे.
त्यामुळे मला परीक्षण वगैरे करता येत नाही.
पण वाचल्यानंतर मनात जी प्रतिक्रिया उमटते, ती व्यक्त करण्याचा प्रयत्न असतो.
शेतकरी तितुका एक एक!