![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गेला रांगडा आषाढ
आला श्रावण कोमल
कशी उमलून आले
वेलीवर पान फुल
कधी पावसाच्या धारा
कधी मुलामा उन्हाचा
उन्ह सावलीचा चाले
खेळ पाठशिवणीचा
किती वर्णावी महती
अशा श्रावण मासाची
सजे धरा वधू सम
निघे वरात सृष्टीची
काळ्या पांढऱ्या ढगांचा
सजे मंडप आकाशी
इंद्रधनु कमानीला
ओढे मंजुळ स्वराशी
मुक्त रंगाची आरास
पखरण ही फुलांची
तरु वेली ही नटली
उधळण सौंदर्याची
बरसती धुंद धारा
नदी धरणात पाणी
निसर्गाचा चमत्कार
हिरवळ माळरानी
फुले निसर्ग किमया
बहरला मधुमास
खळाळती ओढे नाले
काठी फुलांची आरास
~~~~~~~~~~~~~~~~
भरत माळी
न्याहली जि नंदुरबार
मो. 9420168806
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने