Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कास्तकारायन

लेखनविभाग: 
कवितेचे रसग्रहण

कास्तकारायन....(वऱ्हाडी बोली, दिर्घ काव्यसंग्रह )

जे मनाले भावते! तेच वाचाले आवळते! आपली जळनघळन तसी असन त त्या पुस्तकात आपून सोताले सोधत असतो .. ज्या वख्ती म्या कास्तकारायन वाचलं... तवाच... मी आवळलं असं म्हननार नाई त् ते आपलं वाटलं. या दिर्घ वऱ्हाडी काव्य संग्रहाचे निर्मिक हायेत प्रा. डॉ. सुनिल पखाले.

संग्रहाच मुखपृष्ठ पावूनच मी हपचप झालो ! यक तुटेलं बंडीचं चाक! मोळमाळ होयेल आरे पुठ्ठे बुदला अंगार लागल्यानं धुमसत हायेत अंदरून ! या ठिकानी मले जेष्ठ कवि पद्मश्री नारायण सुर्वे यायच्या पुस्तकायचे जे मुखपृष्ठ हायेत त्येच्यावर यकानं पीएचडी केल्याची, जेष्ठ साहित्यिक आदरनीय उत्तम कांबळे सरानी यका व्याख्यानात सांगलेली गोठ आठोली !

डॉ.वासुदेव मुलाटे सर कास्तकारायनाच्या प्रस्तावनेत सांगतात कां ...यकोनीश्शे पंच्याहत्तर च्या बाद दलित साहित्य चळवळीतून अभिव्यक्तीच्या साहित्यिक चौकटा मोळून टाकत, होयेल आत्मजानीवेचा जोरदार उद्रेक पुळे ग्रामीन साहित्यातयी तेवळ्याच ताकतीनं उजागर होतं गेला ! कास्तकाराच्या शिकेल सवरेल पोरायीच्या लिखानातून कथा कविता कादंबऱ्याच्या रुपानं धग वाळतच रायली! आपलं दुखन खुपन आपल्याच बोलित मांडलं त् ते अजूक मुरत जाते ! आपल्या वऱ्हाडी बोलीत लिखान करनारे प्रा. डॉ. सुनिल पखाले सर त्यातलेच यक ..! कास्तकाराच जगनं मातीमोल काहून व्हावं? जगनं महाग अन् मरन यवळ सस्त काहून व्हावं? अश्या परीस्तीतीत आपून काई अधार दिऊ शकतो काय? हा त्यायीच्या चिंतनाचा विशययी जीव्हाळ्याचा !

कवी गझलकार प्रा. सिध्दार्थ भगत सर कास्तकारायनाच्या ब्लर्ब मध्ये म्हनतात का, " माती ! तीच्यावर संस्कार केले का मोती पीकोते! पन दगा देला कां जीनगानीची माती होते !आमचा कास्तकार संस्कार कराले मांग हटत नाई ! मातर हात टाकतो तीथ त्याच्या हातात माती बगर काईच लागत नाई! " असं ताकतीच काव्यात्मक ब्लर्ब, ही अस्सलता हाये कास्तकारायनाची !

कास्तकारायनची सुरवातच " कोंबातून उगोनाऱ्या बळी राज्यास समर्पित " अशी जगाच्या अन्नदात्याले समर्पित भावानं हून, पुळे भावनीक जिव्हाळ्याची वल पानापीच्छे गहरी होतं जाते. भीळत जाते!कोनतायी मोठेपनाचा आव ना आनता, आपल्या मनोगतात पखाले सर सांगतात, का उभ्या जगाले पोसनारा पोशींदा ! मातीत रगताच पानी करून मुखात घास भरोनारा अन्नदाता !आज भुकमरीन मरत हाये! मातीले माय मानून जीव लावनाऱ्या, लेकरायच्या हलाकीवर लिवायची पायी साहित्यावर यावी ही त् नामुस्कीचीच गोठ! आपली सांस्कृतिक जान खतम झाल्याचं लक्षन ! ते खरयी हायेच, स्वातंत्र्याच्या बाद पयल्या पंचवारशीक योजनेत इकासाच जे मॉडेल ठरोन्यात आलं होतं, तेई वावराच्या भरोश्यावरच होतं! केवढा इस्वास भरोसा असीन या मातीवर ! मातीत राबनाऱ्या लेकरायीच्या मनगटायवर! पन मंग असं काय झालं कां, आजघळीले हे मातीचे लेकरं, ज्या मातीनं जगोलं, त्याच मातीवर उभ्या झाळाले, लाखमोलाचे जीव टांगून द्यालेई मांगपुळ पात नाई ! काई इलाजच नसीन काय त्यायीच्या जीनगानीच्या होयेल चींध्यायले टाके माराचा! त्यायीच्या मुक्तीचे कवाळं भैरवकवच लाऊन कशी काय कळेकोट बंद केली असन, आपल्या कृषिप्रधान देशात ? दुख डोयानं पावल्या जात नाई ! मातीत पीकत नाई ! अस्मान सुचू देत नाई ! दलाल चईन पळू देत नाई !पीकलं त् भाव नाई !भाव हाये त् वख्तावर कामी पळत नाई !निर्हानाम वावरामांग लागेलं या अवदशेन अशी कोनती करनी केली असीन कां निंगाला तो दिवस बेईमान हुन नुसता जीवाले खाले उठून रायला ! खोल दरीत धळाळ उळ्या माराले लाऊन रायला ! मनात साचून तरमा कदलोक ठुवावं! आखीर यक जीतजागत मन त् माननार नाईच ना ! बस्स याच उर्मीतून ....तुह्य दुख ते माह्य दुक अश्या मानवतावादी चिंतनातून उपजेलं या कविता..यका टायमाले कुमकर्नावानी झपी जायेल व्यवस्थेवर रट्टे हानते त् दुसर्या बाजूनं कास्तकारात जगन्याच भान पेरासाटी "शेतकरी मनोबलवृध्दी अभियान" " पानी फाउंडेशन " अश्या सामाजिक बांधिलकी जागोनाऱ्या कार्यक्रमातून गावोगावी कास्तकारायनाचे काव्यवाचनयी सुरु असते! कास्तकारायन नुसतं कागदावर पळून राहत नाई! लिहून मोकय होत नाई त् लोकांतयी पोचत हाये!
मराठी साहित्यात दिर्घ कवितेची परंपरा हायेच पन वऱ्हाडी बोलीत असं पाहून जीवाले गमलं!

या संग्रहाची खाशीयत म्हंज्ये, कवितेले नंबर नाई ,कोनतयी शिर्षक नाई, सारं कसं खुल्या अभायाखाली पुस्तकारुपी वावरात रनभन पसरेल माहागीमोलाच अक्षरअगाईत ! कोनतयी पान उघळा ! कुठूनयी सुरवात करा ! शुरूवात का कोई अंत नही ! यकसस्ट पानाचा हा लेखाजोखा कास्तकाराची गाथाच हाये!

सुरवातीलेच " कास्तकार दादा आईक आता ! सांगतो तुले सल्ला ! कीतीक दिवस भरसीन राज्या सावकाराचा गल्ला !" अशी मयेनं खांद्यावर हात ठीऊन आपल्या दोस्ताले! भावाले ..अन् समस्त कास्तकारायीले खबरदारीचा सल्ला दीऊन....पुळे भयान वास्तवाची जानीव करून देतानी "लुचाडायची दुनिया सारी सत्याले न्याय नाई ! दिवस तुवा उगवन थांब करू नोको घाई " अशी पानापानावर कास्तकाराच्या सुकाची ! दुखाची ! सपनाची ! संघर्षाची !अस्मानी सुलतानी धोक्याची ! लुबाळल्याची ! रट्टे हानाची! मांडनी पानापानावर जिव्हाळ्यातून होतच राह्यते ....!

कास्तकारायन (वऱ्हाडी बोली,दिर्घ काव्य संग्रह )
कवि:- प्रा. डॉ. सुनिल पखाले
प्रकाशक :- निनाद प्रकाशन, यवतमाळ
मूल्य :- १२० रुपये .

रवींद्र अंबादास दळवी,नाशिक

================================================================

Share

प्रतिक्रिया