नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
व्रुत्त-आनंदकण
गण-गागालगालगागा..यति..गागालगालगागा
गझल
----------
सत्ते तुझ्या प्रितीचे खोटेच भाव सारे
मीठीत घे मला तू ओलेच घाव सारे
कर्जा तुझ्या विषाने होईल गाव खाली
शेतातल्या थव्यांचे फास्यात नाव सारे
स्वप्नात ये परी तू घेऊन चल कुठेही
माझे मला कळेना पाण्यात गाव सारे
हातात हात घेऊ एका स्वरात गाऊ
वेडांत मग मनाचे सब ठीक ठाव सारे
'राजेश' देह त्यांचे पोळून पार गेले
शोधात भाकरीच्या पेटून पावसारे
-राजेश जौंजाळ पोहणा
******************************
प्रतिक्रिया
खूप छान!!!!
खूप छान! राजेश....
Sunder
Khoop sunder rajesh
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने