Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य का नाही?

भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य का नाही?

अकोला – दि 28
श्रम, बुद्धी व गुंतवणुकीच्या बळावर धोका पत्करून संपत्तीचे सृजन करणारा शेतकरी स्वतःच आपले उत्पन्न वाढवतो व देशाच्या संपत्तीतही भर घालत असतो . फक्त सरकारने त्याच्या तंत्रज्ञान व बाजारपेठाच्या मार्गातील अडसर दूर करावे.
शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी आज केंद्रीय गृह व रसायन राज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांना शेतकऱ्यांच्या भावना कळविल्या.
शेती हा देशाचा मुख्य प्राथमीक व्यवसाय असून देशातील ६०% जनसंख्या कृषीवर अवलंबून असतांना जागतीक परिवेशामध्ये भारतीय शेतकरी अद्यावत तंत्रज्ञानाशिवाय स्पर्धेमध्ये कसा टिकेल हा मोठा प्रश्न सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे उदभवला आहे.नुकत्याच झालेल्या हंगामात गुलाबी बोन्ड अळी च्या प्रादुर्भावा ने ४५% एवढे उत्पादनाचे नुकसान झाले. कीटकनाशकांवर मोठा खर्च होऊन आर्थीक नुकसाना मुळे शेतकऱ्यांमध्ये आलेल्या उद्विग्नतेला जबाबदार कोण? या वर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.सरकारच्या तंत्रज्ञान विरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी स्पर्धाक्षम होण्यास अडसर निर्माण झाला आहे.
BT ट्रायल्स वर बंदी आणतांना कुठलेही ठोस निष्कर्ष सरकार ला आजतागायत देता आले नाहीत.जगातील अनेक प्रगत देशांत BT चे अद्यावत तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमालीचा घटला व उत्पादकताही प्रचंड वाढली आहे.अशा परिस्थितीत जनसंख्येचा मोठा हिस्सा शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या देशात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचीत ठेवण्याचे उफराटे धोरण सरकार का अवलंबवित आहे ? सरकारी धोरणांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा हास्यास्पद आहे अशा भावना शेतकरी संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड,युवा आघाडी विदर्भ प्रमुख डॉ.निलेश पाटील, शेतकरी संघटना प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हा प्रमुख अविनाश नाकट उपस्थित होते.आपल्या भावना सरकार दरबारी कळवू असे आश्वासन हंसराज अहिर यांनी यावेळी दिले.
 
-विलास ताथोड
शेतकरी संघटना सोशल मिडिया प्रमुख
विदर्भ समाचार
Share