पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
नागपुरी तडका
बायको
थोडीशी पगली, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥१॥
सलवार घाल म्हनलं तं नववारी घालते कपाळाच्या मंधामंधी गोल कुंकू लावते टिकल्या-मिकल्या लावाच्या फ़ंदात पडत नाही गळ्यामंधी गुंजीभर सोनं मिरवत नाही थोडीशी येडपट, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥२॥
सिनेमा पाहू म्हनलं तं भागवतात जाते माह्यासाठी मुठभर शिरनी घेऊन येते मास-मच्छी-अंडीले हात लावत नाही तरी बाप्पा तीले काही देव पावत नाही थोडीशी भोळसट, थोडीशी सायको देवानं देल्ली बावा, अशी कशी बायको ….॥३॥
सार्यायले खाऊ घालून, उरलंसुरलं खाते कवाकवा पानी पेऊन तशीच झोपी जाते
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.