नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मरणाची भिक
(चाल - सुंदर ते ध्यान)
यमाचीये व्दारी माझा शेतकरी,
भिक मरणाची मागतसे ।।धृ।।
राब राबतो शेतात,
काही मिळत नाही त्याचे हातात ।।१।।
कर्ज काढुनी तो शेती अपुली करी,
व्याजात गेली पिके सारी ।।२।।
जेव्हा पिक येते याच जोमात,
तेव्हा नेमकी किड घुसते त्यात ।।३।।
कधी कोपतो निसर्ग राजा,
कधी दगा देते सरकार ।।४।।
जेव्हा पिकते याला लई भारी,
भावबाजी वधारते सारी ।।५।।
सरकार करते मदत जाहिर,
पण प्रत्यक्ष कधी मिळणार? ।।६ ।।
म्हणुनी त्याचे क्षीण झाले मन,
यमापुढे मागतो मरण ।।७।।
श्रीकांत धोटे
टाकळी चनाजी
प्रतिक्रिया
छान.
एक ओळ अर्धवट असल्याचे जाणवले.
हेमंत साळुंके
पाने