

आताच मोड आले वापून यार हो
जावू नका तुम्ही ते जाळून यार हो
घेवून दूर गेला वारा ढगास कोठे
सारी जमीन गेली तापून यार हो
आले सफेद पक्षी गेले पुन्हा कुठे
ते आसवांस खोट्या ढाळून यार हो
ठेवून मज अडाणी जातात ते पुढे
मातीत जीव माझा गाढून यार हो
मातीस पोसणारा तो मातॄभक्त मी
बाकी कलेवरांना सोडून यार हो
हेमंत साळुंके,
लातूर, जि. लातूर
Comments
व्वा!
पाचही शेर बढिया!
मातीची व्यथा चांगली हाताळली आहे.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
धन्यवाद सर,
मी अजून नवीन आहे या क्षेत्रात माझी अजून एक गझल सदॄश्य रचना स्पर्धेस पाठवत आहे स्विकार व्हावा!
हेमंत साळुंके
गझल
मी पुढची गझल सदॄश्य रचना देवू का? मात्र मला भनभन नाय पायजे. मी माज्या मर्जीने लिवतो.
हेमंत साळुंके
स्वागत आहे
पुढची रचना अवश्य द्या.
शेतकरी तितुका एक एक!
गझल
आपल्या मातीप्रेमाला माझे नमन होते आणि आहे साहेब. रचना उद्या अनिश्चीत समयी सहभागी करेन विनम्र धन्यवाद....
हेमंत साळुंके
गझल
धन्यवाद.
हेमंत साळुंके
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings