स्ञीयांची तु माऊली,
स्ञीयांची तु सावली,
काया अपुली वाहीली,
स्ञी उध्दारासाठी.......
उपसले तु कष्ट,
भिती केली नष्ट,
बोललीस स्पष्ट,
स्ञी उध्दारासाठी .....
तु ज्योतीबाचा हात,
राबलीस दिनरात,
सोसले आघात,
स्ञीउध्दारासाठी......
सोसलेस शेण,
मोठे झाले मन,
अर्पीला प्रत्येक क्षण,
स्ञी उध्दारासाठी .........
स्ञीयांची तु माता,
त्यांची तु भाग्यविधाता,
तुझ्या कर्तुत्वाने त्या आता,
पोचल्या यशोशिखरावर.....
!!!""" श्रीकांत धोटे """!!!
!!टाकळी चनाजी!!
बालीकादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
