इज्राईल प्रशिक्षित प्रगतिशील शेतकऱ्यांची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
*अॅग्रीसन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, आर्वी छोटी*
*त. हिंगणघाट जि. वर्धा *
कंपनी विषयक संक्षिप्त माहिती
*कंपनीची स्थापना* : २२ ते २८ फेब्रुवारी २०१९ मध्ये महाराष्ट्रातील प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी इजरायल अभ्यास दौरा करून प्रशिक्षित झालेल्या राज्यातील विविध भागातील महाराष्ट्रीय शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही कंपनी 2019 यावर्षी स्थापन केली असून अद्ययावत शेती तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनीचे ९ संचालकांचे संचालक मंडळ असून कंपनीचे एकूण ४२३ शेअरहोल्डर आहेत. बीजोत्पादन आणि विपणन या क्षेत्रात कंपनीचे काम सुरू असून शेतीमाल प्रक्रिया स्वच्छता आणि प्रतवारी हा प्रोजेक्ट स्मार्ट या योजनेअंतर्गत मंजूर झालेला आहे.
*स्मार्ट प्रोजेक्ट* : बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) प्रोजेक्ट अंतर्गत कंपनीला "धान्य स्वच्छता, प्रतवारी आणि साठवणूक" या १४२.४९ लक्ष रुपये खर्चाच्या प्रकल्पास मंजुरी मिळाली असून त्या अंतर्गत गट नंबर ४४/१, पवनी रोड, आर्वी छोटी येथे बांधकाम आणि यंत्रसामुग्री स्थापनेचे 90% काम पूर्ण झालेले आहे.
*बीजोत्पादन आणि विपणन* : सन २०१९ पासून कंपनी सोयाबीन, चना आणि तूर या पिकांच्या बीजोत्पादन आणि विपणन कार्यात अग्रेसर असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचेशी विविध पिकांच्या पैदासकार बियाणासाठी करार केले आहेत.
*आर्थिक उलाढाल* : वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षाची कंपनीची उलाढाल रु. ५२,२४,८५६/- इतकी झाली असून २०२५-२६ या वर्षाकरिता ५ कोटी रु. वार्षिक उलाढाल लक्ष गाठायचे नियोजन केले आहे.
*या कंपनीशी जुळण्याची इच्छा असल्यास संपर्क करावा. आपले स्वागत आहे.*
अधिक माहितीसाठी संपर्क :
*गंगाधर मुटे*