![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जगाचे सोबती चालणे खोटेच होते,
आपले म्हणून असणाऱ्यांचे पाठीमागे कारस्थाने बरेच होते..
तुटलेले माणुसकीचे धागेदोरे जोडले गेले,
एका कोरोना विषाणूचे तेवढे कारण होते..
उन्हात घर असल्याची बालपणापासून कुजबुज कानी,
नेमके त्या उन्हात पोळण्याचे दिवस बाकी होते..
मणसुबे कैक आहेत संकटा तुझे,
कुणाचीतरी घातपात करणार एवढे ठाऊक होते..
पीक जोमात असते तेव्हा काळीज अधिकच धडधडते,
एवढे सुख आजवर केवळ दगा देण्यासच आले होते..
शेतात कुटुंबासवे शतके ठोकले जाते,
तरी याकडे नेहमी दुर्लक्ष का होते..?
- कृष्णा जावळे.