![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
स्वप्न शेतात फुललं...
घाम गाळला मातीत
तव्हा आली खरी ओलं...
मातीतल्या संसाराचा
असा सांभाळला तोलं...
जीव लावला बैलाले
त्यानं देह झिजवला...
संगतीनं म्यां बैलाच्या
जीव मातीत ओतला...
पेरलेल्या बियाण्याले
जव्हा फुटलेत कोंब...
हंगामातल्या कष्टांच
त्यात दिसे प्रतिबिंब...
किती हरीक मनाले
पीक कापताना होई...
बैलबंडी हाकताना
डोया पाणावून जाई...
पीक घरी आलं आज
घर धान्यानं भरलं...
बैलजोडीच्या साथीनं
स्वप्न शेतात फुललं...
...... निलेश कवडे अकोला
मो. 9822367706
प्रतिक्रिया
बैल जोडीच्या साथीन!
नेहमीप्रमाणे अप्रतिम निलेश सर!
हार्दिक शुभेच्छा!!
धन्यवाद
मनापासून धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
फारच छान, निलेशजी!
फारच छान, निलेशजी!
राजीव मासरूळकर
स्वप्न शेतात फुललं...
अप्रतिम रचना निलेश.
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
पाने