नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरिय online लेखन स्पर्धा २०२४ साठी
(अ. भा मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम )
पद्य विभाग
काव्यप्रकार - मुक्तछंद
विषय - शेतमालाचे भाव
मॉलमध्ये असेल त्या किमतीत
सर्व काही खरेदी करतात राव
जड लगेच वाटतात तेव्हा सर्वा
थोडे वाढता शेतमालाचे भाव
एक दोन रुपयाच्या मालासाठीही
करत असता उगीचच घासाघीस
ऑनलाइन शॉपिंग करताना मग
तिथे किमतींचा काढत नाही कीस
घाम गाळून शेतकरी शेतात
कष्टाने पिकवितो आपली शेती
याच लोण्याच्या गोळ्यावर रे
व्यापारी भरतो स्वतः ची पोती
श्रमाचे बळीराजाच्या आपल्या
आपणच करू या थोडे मोल
शेतकऱ्याकडून काहीही घेताना
वस्तूंचा नको करू तोलमोल
शासनापासून सामान्यपर्यंत
कोणालाच नाही त्याची कदर
योग्य हमीभाव कर्जमाफी देऊन
अन्नदात्याचा करायला हवा आदर
एका दाण्यापासून उभ्या करतो
दरवर्षी धान्याच्या जो मोठया राशी
योग्य भाव न मिळाल्याने मालास
शेतकऱ्याची गाठ असते गरीबीशी
दयनिय ही अवस्था माझ्या बाची
तेव्हाच कायमची दूर होईल
नव ज्ञान नवतंत्रज्ञान वापरून
आधुनिक शेती जेव्हा करत जाईल
कवयित्री सायराबानू वजीर चौगुले
आशियाना अपार्टमेंट
ब्लॉक नं.१०२ , बी विंग
कचेरी रोड माणगाव
ता.माणगाव जि.रायगड
महाराष्ट्र भारत
मोबा. ८४८४९३२१४६
Email Id sayrabanuchougule@gmail.com