
नमस्कार ! ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलन देशातील राजकीय लोकांना दिशा देणारे होते .देशातील शेतकऱ्यांचे मत जाणुन घेण्यासाठी होऊ घातलेले पंतप्रधान शरद जोशी यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याची आठवण त्यांनी सांगितली.देशातील अर्थकारण व राजकारण यांना शरद जोशींं मुळे वेगळे वळण मिळाले असुन त्यांनी महिलांना सन्मान देऊन समाजात बरोबरीचे स्थान देणाऱ्या लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत शरद जोशी यांनी रावेरी येथे सीतेचे मंदीर बांधुन सीतेलाही सन्मान दिल्याचे सांगितले. शरद जोशी हे द्रष्टे नेते होते त्यांनी एक नवी संस्कृती निर्माण केल्याचे ही त्यांनी सांगितले .लोकांच्या मनासोबतच त्यांच्या लग्नपत्रिकेवर मानाचे स्थान मिळवणाऱ्या शरद जोशींचे जीवन चरित्र वाचुन हजारो शरद जोशी निर्माण व्हावेत अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली . या चरित्राचे लेखक भानु काळे यांनी आपल्या मनोगतात या चरित्र लेखन करतांना आलेले अनुभव व्यक्त करुन शरद जोशींचे स्मारक व्हावे अशी ईच्छा व्यक्त केली .