
|| आता तयार व्हावे | लढण्यास लेखणीने ||
|| रक्षण अबोलतेचे | करण्यास लेखणीने ||
|| लटकी-पुचाट वाणी | शिरजोर होत आहे ||
|| यावे रणात गच्ची | धरण्यास लेखणीने ||
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी यांच्या ९० व्या जयंतीदिनानिमित्त
शेती अर्थ प्रबोधिनीचा उपक्रम
१३ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, ONLINE
दिनांक : बुधवार, दि. ३ ते मंगळवार, दि. ९ सप्टेंबर, २०२५
वेळ : दररोज रात्री ९.०० ते १०.००
Zoom Online : फेसबुक किंवा युट्यूब Live
-=- कार्यक्रमपत्रिका -=-
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून दि. ३ ते ९ सप्टेंबर, २०२५ रोजी सात दिवसीय १३ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, ONLINE आयोजित करण्यात आले आहे.
: कार्यक्रमाची रुपरेषा :
बुधवार, दि. ३ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.२० :
दीपप्रज्वलन, शेतकरी नमनगीत, मराठी गौरवगीत
गीत : मा. गंगाधर मुटे
संगीत संयोजन : मा. गणेश मुटे
गायक : विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे, ज्ञानेश पोहाणे
: रात्री ०९.२० ते ०९.३५ :
स्वागताध्यक्ष : मा. डॉ. मनीषा रिठे, उपाध्यक्ष
, अ. भा. शेतकरी साहित्य चळवळ
: रात्री ०९.३५ ते १०.०० :
उदघाटक : मा. श्रीपाद अपराजित, सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तथा संपादक, महाराष्ट्र टाइम्स
गुरुवार, दि. ४ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
प्रास्ताविक : मा. श्री. गंगाधर मुटे, संस्थापक अध्यक्ष, शेतकरी साहित्य चळवळ
: रात्री ०९.३० ते १०.०० :
: काव्यवाचन :
मा. रावसाहेब जाधव (नाशिक) - अध्यक्ष
मा. सुनील बावणे (चंद्रपुर) - सूत्रसंचालन
मा. नरेंद्र गंधारे (वर्धा)
मा. निलेश कवडे (अकोला)
मा. राजेंद्र फंड (अहिल्यानगर )
मा. किशोरी पाटील (पालघर)
शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: काव्यवाचन :
मा. तुळशीराम बोबडे (अकोला) - अध्यक्ष
मा. विरेन्द्र बेडसे (धुळे) - सूत्रसंचालन
मा. रवींद्र दळवी (नाशिक)
मा. साहेबराव तायडे (अकोला)
मा. भारती सावंत
(नवी मुंबई)
मा. खुशाल गुल्हाणे (अमरावती)
मा. साईनाथ रहाटकर (नांदेड)
मा. गंगाधर मुटे (वर्धा)
: रात्री ०९.३० ते १०.०० :
: विषय विश्लेषण - १ :
विषय : शेती विषयक शासकीय धोरणे - युगात्मा शरद जोशी यांच्या उदयपुर्व आणि पश्चात
विश्लेषक - मा. मधुसूदन हरणे, प्रदेश अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
शनिवार, दि. ६ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: काव्यवाचन :
मा. भारती सावंत (नवी मुंबई) - अध्यक्ष
मा. रवींद्र दळवी (नाशिक) - सूत्रसंचालन
मा. रावसाहेब जाधव (नाशिक)
मा. रंगनाथ तालवटकर (वर्धा)
मा. नंदकिशोर ठोंबरे (नाशिक)
मा. मनीषा रिठे (वर्धा)
मा. प्रफुल्ल भुजाडे (अमरावती)
मा. तुळशीराम बोबडे (अकोला)
: रात्री ०९.३० ते १०.०० :
: विषय विश्लेषण - २ :
विषय : शेतकरी चळवळीच्या विचारांचा पत्रकारितेवरील प्रभाव
विश्लेषक - मा. सुनील चरपे, वरिष्ठ पत्रकार, लोकमत वृत्तपत्र समूह
रविवार, दि. ७ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: काव्यवाचन :
मा. राजेंद्र फंड (अहिल्यानगर) - अध्यक्ष
मा. नरेंद्र गंधारे (वर्धा) - सूत्रसंचालन
मा. किशोरी पाटील (पालघर)
मा. साहेबराव तायडे (अकोला)
मा. खुशाल गुल्हाणे (अमरावती)
मा. साईनाथ रहाटकर (नांदेड)
मा. मनीषा रिठे (वर्धा)
: रात्री ०९.३० ते १०.०० :
: विषय विश्लेषण - ३ :
विषय : ग्रामीण कवितेतील शेतकरी जीवन
विश्लेषक - मा. डॉ. राजेंद्र मुंढे, ज्येष्ठ साहित्य अभ्यासक व भाष्यकार
सोमवार, दि. ८ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते ०९.३० :
: काव्यवाचन :
मा. निलेश कवडे (अकोला) - अध्यक्ष
मा. रंगनाथ तालवटकर (वर्धा) - सूत्रसंचालन
मा. सुनील बावणे (चंद्रपुर)
मा. विरेन्द्र बेडसे (धुळे)
मा. नंदकिशोर ठोंबरे (नाशिक)
मा. प्रफुल्ल भुजाडे (अमरावती)
मा. गंगाधर मुटे (वर्धा)
: रात्री ०९.३० ते १०.०० :
: विषय विश्लेषण - ४ :
विषय : प्रसार माध्यम आणि शेती
विश्लेषक - मा. मनोज भोयर, ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल एडिटर, नवराष्ट्र
मंगळवार, दि. ९ सप्टेंबर, २०२५
: रात्री ०९.०० ते १०.०० :
प्रमुख अतिथी : मा. श्री. अॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट
संमेलनाध्यक्ष : मा. दिलीप भोयर, जेष्ठ शेतकरी कृतिशील साहित्यिक
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
१३ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन,Online
=`=`=`=`=`=
(दि. १४ ऑगष्ट २०२५ ची पोस्ट)
अग्रिम प्रतिनिधी नोंदणी (Advance Booking) :
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २५ ऑगस्ट २०२५
प्रतिनिधी सहभाग शुल्क : Zoom stream, Live संसाधने आणि flex च्या खर्चाकरिता प्रत्येकी रु. २५१/-
अ] प्रतिनिधी सहभाग शुल्क कसे भरावे :
ऑनलाईन किंवा थेट शुल्क खालील खात्यात जमा करावे.
Punjab National Bank
Branch - Hinganghat
A/c Name - SHETI ARTH PRABODHINI
A/c No - 0202000105179647
IFSC Code - PUNB0020200
MICR Code - 442024005
शक्यतो याच
खात्यात शुल्क जमा करावे. शक्य नसेल तरच
खालील अंगारमळा QR कोड वापरावा.

* * * *
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : सहभाग शुल्क भरून झाले की ईमेल किंवा व्हाटसप द्वारे खालील माहिती पाठवावी. :
-
abmsss2015@gmail.com या ईमेलवर किंवा 97 30 78 60 04 या व्हाटसपवर खालीलप्रमाणे माहिती पाठवावी..
-
ईमेलच्या विषयात ''अग्रिम प्रतिनिधी नोंदणी'' लिहिणे आवश्यक आहे.
-
पूर्ण नाव (शक्यतो मराठी):
-
पूर्ण पत्ता :
-
तालुका :
-
जिल्हा :
-
स्त्री/पुरुष :
-
वय :
-
मोबाईल नंबर :
-
भरलेले प्रतिनिधी सहभाग शुल्क रुपये :
-
Txn/Ref/Rcpt No :
-
शुल्क भरल्याचा दिनांक :
-
वरीलप्रमाणे मजकूर लिहून ईमेल किंवा व्हाटसप द्वारे प्रतिनिधी नोंदणी करावी.
आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेत!
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
कार्याध्यक्ष
१३ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन,Online