Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।।

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 2:07 PM IST, मंगळ February 09, 2010
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।।



कसा बाळ माझा? श्याम सावळासा

जरासा जरासा, जरा साजरासा...!!



चांदणे स्वरुपी चंदनाचे अंग

मुख पाहतांना तारकाही दंग

असा बाळ माझा, चंद्र गोजिरासा

जरासा जरासा, जरा साजरासा...!!



नेत्र काजळीले, तीटबिंदु गाली

टिळा देखुनिया दृष्टही पळाली

हसे बाळ माझा, विठू हासरासा

जरासा जरासा, जरा साजरासा...!!



ओठी अंगठ्याने करी सुधापान

तया चुंबण्याला लोभावते मन

दिसे बाळ माझा, राम सुंदरासा

जरासा जरासा, जरा साजरासा...!!



आली बघा आली, नीजराणी आली

मिटमिट पापण्यांची, पेंग लुब्ध झाली

निजे बाळ माझा अभय सागरासा

जरासा जरासा, जरा साजरासा...!!


 - गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
नऊ/दोन/दोन हजार दहा
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=


बळीराजा
रानमेवा
माझी वाङ्मयशेती
Gangadhar Mute
अभय
गंगाधर मुटे
माझी कविता
वाङ्मयशेती
कविता
काव्यधारा
बालकविता
अंगाईगीत
पाळणा
बालगीत
शब्दांची जादूच केलीत....!

संपादक

बुधवार, May 23, 2012 - 20:11
Permalink
New

फेसबूकवरील स्वामीजी निश्चलानंद यांचा प्रतिसाद

मुटेसाहेब....
शब्दांची जादूच केलीत....!
"जरासा जरासा, जरा साजरासा...!!"
केवळ एक अक्षर इकडचे तिकडे नेऊन अफलातून श्लेष साधला आहे...

आणि आपल्या बाळाचं कौतुक करताना आईच्या होणाऱ्या द्विधा मन:स्थितिचं अत्यन्त सुरेख दर्शन आपण या ओळीचा ध्रुवपदासारखा वापर करून घडवलं आहे...!
एकीकडे आईला आपला बाळ हा सावळा श्याम, गोजिरा चन्द्र, हासरा विठू किंवा सुंदर राम वाटतो.... तेच वर्णन ती एकेका कडव्यात गाते.... आणि क्षणभरात जणु भानावर येत तिला तो "जरासा जरासा" आणि "जरा साजरासा" असा आपला चिमणा बाळ दिसायला लागतो.... ती ध्रुवपदाच्या त्या विलक्षण ओळीवर येते...!!

आईच्या या मन:स्थितिचं असं विलोभनीय दर्शन घडवत या रचनेनं काव्यात्मकतेची वेगळीच उंची गाठली आहे.... !!
अद्भुत !!

  • Log in or register to post comments
गंगाधरजी: ग्रेट. मजा आली.

प्रद्युम्नसंतु

शुक्रवार, June 15, 2012 - 23:20
Permalink
New

गंगाधरजी: ग्रेट. मजा आली.

  • Log in or register to post comments
देव तुमच्या आत्म्यास

गंगाधर मुटे

बुधवार, April 24, 2013 - 12:44
Permalink
New

प्रद्युम्नसंतु,

आज तुमची प्रकर्षाने आठवण झाली. :(

देव तुमच्या आत्म्यास शांती प्रदान करो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! :(

  • Log in or register to post comments

In reply to गंगाधरजी: ग्रेट. मजा आली. by प्रद्युम्नसंतु

फेसबूक लिंक

admin

मंगळवार, July 19, 2022 - 11:23
Permalink
New

फेसबूक लिंक

https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid02hv1SmY2Tez9U537SUhH…

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 27573 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • Kiran mahadev …

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 480 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • धन्यवाद
    19 hours 14 minutes ago
  • धन्यवाद
    19 hours 15 minutes ago
  • निलेश जगदेवराव देवकर सर,…
    20 hours 55 minutes ago
  • संकेत सुरेंद्र देशमुख,…
    20 hours 58 minutes ago
  • अस्सल ग्रामीण मातीचा सुगंध…
    21 hours ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 30
योद्धा शेतकरी 30
हरवलेल्या पोळ्याचे संदर्भ 30
गझल: घेऊन जा करोना 30
दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे : गझल ॥३२॥ 30
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 30
शेतक-यांचा राजा बळीराजा 29
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 28
लाँक 28
जीवनोत्सव! 28
गज़ल : विळखा अरे ऋणाचा 28
धरेचे लेकरू आपण 26
सत्कार समारंभ : वर्धा 26
मोती असे गळाले.. 26
व्यवस्था जोरात बदलली पाहिजे! 26
१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक 26
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल 26
भारत कशाला म्हणतात! 26
IT कार्यशाळा - इंटरनेटचे धोके आणि फसवणुकीची कारणे - भाग-१२ 26
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 26
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,047
कान पकडू नये 25,937
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,800
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,613
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,438
माय मराठी स्तवन git 25,427
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,164
एवढा मोठा नांगूर... 25,158
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,099
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,965
कापसाचा उत्पादन खर्च 24,492
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,430
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,108
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 24,073
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,070
शेतकरी पात्रता निकष 24,019
शेतकरी प्रकाशन 23,939
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,934
हे गणराज्य की धनराज्य? 23,920
शेतकरी संघटक २१ जुलै २०११ - अंक ८ 23,762
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini