नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बैल...
(तुकडा पहिला)
बैल नसतो नुसता बैल
पाळलेला असतो तो गव्हाणीला
कष्टाळू मनाच्या
आणि असतो बाांधलेला
सहजीवनाच्या साथीला
सजीवतेच्या दोराने...
चढत जातो अंगावर त्याच्या
सुांदरतेचा साज काळजातून थेट...
आणि पाठीवर त्याच्या
मारलेली थापही
करते भार हलका छातीचा
रापल्या हाताांच्या
उलगडत घड्या...
तोंडातील त्याच्या चव पुरणपोळीची
म्हणूनच कदाचित ठेवते नेऊन
पेशीरचनेच्या पलीकडे
आणि होत जातात धूसर
भिंग भौतिकतेचे...
(तुकडा दुसरा...)
दमलेल्या बैलाच्या पाठीवर
थाप मारताना
त्याच्या काळजातला प्रेमळ फेस
कातडीच्या केसाळ थरथरीतून
थेट पोहचतो-
माझ्या काळजातल्या नात्याच्या
ठळक घट्टसर फेसाळ दुधभरल्या
चरवीच्या तोंडावरून
ओसांडून उसळी घेणाऱ्या
फेसाचे जतन करणाऱ्या हातांच्या
हळुवार कोमलपणाच्या संवेदन स्थैर्याला जागवत
गायकुशीत पान्हावलेल्या
कासेच्या निरागस मायेपर्यंत...
आणि पडतो गळून
आसुडाचा दांडुका
माझ्याही नकळत
जो उचलला होता वहीत उरकण्यासाठी
नाांगरटीचे...
जेथे फक्त
चिरायचे होते फाळाने अंग
आणि
सजवायचे होते स्वप्न हिरवे
कातळ काळाच्या उरातून
नाचत उगवणारे...
खरंच,
सोबतीचाही पडावाना विसर
स्वतःसह-
एकाग्रतेच्या या शिखरावर!
-रावसाहेब जाधव
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने