Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

पुस्तक समीक्षण

Main page content

By Rohini Mukund Pande | 10:40 PM IST, मंगळ November 14, 2023
पुस्तक समीक्षण

"गावभुईचं गोंदण - एक सृजनोत्सवी काव्यसंग्रह!"
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

"गावं भुईचं गोंदण" हा कविता संग्रह म्हणजे ग्रामीण जीवन शैलीतला हृदयस्थ मृदगंध होय. कवी श्रीनिवास मस्के यांनी हा दरवळ आपल्या शब्दातून थेट रसिकांच्या हृदयापर्यन्त पोहोचवला आहे.ग्रामीण जीवनातला सच्चेपणा, निसर्गाशी तादात्म्य साधणारी शब्दकळा हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य. झपाट्याने होणारं शहरीकरण आणि त्यात इंग्रजीचा सर्रास होणारा वापर यात अश्या अस्सल ग्रामीण जातकुळीच्या भाषांची हल्ली गळचेपी होताना दिसत आहे. अश्या परिस्थितीत या ग्रामीण पार्शवभूमीच्या आणि ग्रामीण बोलिभाषेतील कविता म्हणजे आपला वारसा असोशीने जपण्याचा स्तुत्य प्रयत्न होय ,असं‌ मला वाटतं.आकाश गाठत असताना पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवावेत हे सर्वांनांच ज्ञात असतं पण तस प्रत्यक्षात होताना फारसं दिसत नाही.तो आपली नाळ कुठे आणि कशी जुळली आहे हे माणूस विसरत चालला आहे आणि नेमकी तिच आठवण करून देण्याचं काम हा काव्य संग्रह करतो. या काव्य संग्रहाला ना.धो.
महानोर यांची सुंदर पाठराखण लाभलेली आहे.

कवी श्रीनिवास मस्के यांची कविता म्हणजे नेमकं काय आहे, हे तेच आपल्या कवितेत सांगून जातात...

माझी कविता
शेणामातीनं‌ भरलेली
उकंड्यात निपचीत पडते
कुजवून शब्दाशब्दांना
रानभुईत उगवते

दयनीय अश्या प्रतिकूल परिस्थितीत हा सृजनाचा आशावाद कमाल आहे.

याशिवाय कित्येक कळापासून न बदललेली गाव खेड्यातली परिस्थिती, जातीयवाद , खेड्यानं कधी झापड लावून जपलेलं तर कधी त्यांच्यावर लादलं गेललं अप्रगत जीवन या सर्व गोष्टींचा मार्मिक उहापोह या काव्य संग्रहात दिसून येतो.

सामान्य माणूस म्हणजे नेमकं कोण..? हा भाबडा अन विचार प्रवण प्रश्न कवी मांडतात.. आणि सामान्यातल्या असामान्यत्वाकडे निर्देश करताना म्हणतात..

जात्यावर पायाला पाय लावून
मरण कांडताना
हजार ग्रंथांचं जगण्याचं तंत्र
एका ओवीत सांगणारी
तांबड फुटण्या आधी
मातीला भिडणारी
कशी असेल सामान्य...?

या ओळीत ग्रामीण स्त्रीच्या असामान्यत्वा शिवाय तिचं अखंड राबतं जीवन कवी अधोरेखित करतात. एक पुरुष ग्रामीण स्त्री जाणीवांचा सहज सुंदर मांडणी कवी लिलया
करून जातात.मग त्या माहेरच्या कविता असोत किंवा
शेतात काम करणाऱ्या स्त्रीच्या जाणीवा असोत...

आंब्याच्या डहाळीला
झुले लुगाड्याचा झोका,
नजर तान्हूल्याकडं
चुके काळजाचा ठोका

ही भावना हृदय हेलावुन टाकते. कविच निरीक्षण
आणि त्या निरीक्षणाची यथोचीत अभिव्यक्ती यात
हातखंडा दिसून येतो."रानवाट" " पदर जरा सावर" या
मला विशेष भावलेल्या कविता.

तस पाहिलं तर ग्रामीण जीवनातलं साचलेपण ,पडझड, वेदना, ऋणानुबंध हे सगळंच यांच्या काव्यात दिसून येत.
निसर्ग आणि त्या निसर्गानं नटलेलं गावं हे समीकरण
नितांत सुंदर आहे.तशी काही वर्णन कवितेत आढळूनही
आली आहेत.

कणीस आलं पोटाऱ्यात
हिरवीगर्द शेंग
ओघळला थेंब थेंब
सळसळ पानावर
बाई येऊन गेली सर
कशी झरझर

अशी सुंदर वर्णन आढळून येतातही पण व्यथेची अभिव्यक्तीच अधिक दिसून येते. भोगलेपण,वेदना खोल खोल जपल्याची जाणीव अनेक काव्यातून होते. रितेपण, आकांत, मोडलेल्या माणसाची,श्रद्धांजली ,दांडके ही त्यांच्या कवितेची नावचं त्यांच्या मनातल्या मळभाबद्दल सूचक अस बरचं काही सांगून जातात.

चाळणीच आयुष्याची
तरी ठिगळ जोडावं
काळजातल्या भुईला
कस वाऱ्यावर सोडावं

अशी दुखरी सल शब्दाशब्दातून जाणवते.

कविकडे प्रतिभा आणि शब्दसामर्थ्य आजोड आहे.सुंदर रूपकांचा अलंकारिक साज ग्रामीण भाषेतही दर्शवीला आहे पण काव्य संग्रह अधिक व्यापक होऊ शकला असता.विषयांचा तोच तोपणा आढळून येतो शिवाय कुठे कुठे यमक योजनाही खटकून जाते.जसे -'झुला -मायीला' 'जपा -बघा' इ. भावकविता आणखी समृद्ध होऊ शकते.अर्थात हे माझं मत आहे.

कवी श्रीनिवास मस्के यांनी अल्पावधीतच उत्तम कवी
म्हणून ओळख निर्माण केलेलीच आहे."रानकवी" म्हणून
ते प्रसिद्ध आहेतच.धरेच्या गर्भात सामावून अंकुरणारी त्यांची कविता सृजनोत्सवी आहे.साहित्य विश्वात स्वतः चा वेगळा ठसा निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या समृद्ध लेखणीत आहे.त्यांच्या भावी साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

©रोहिणी पांडे,नांदेड
Mob.9518749475

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

गुरुवार, November 16, 2023 - 14:45
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

CongratsCongrats

कृपया प्रवेशिकेचे शीर्षक बदलावे. अनेकदा समान शीर्षक असल्याने गुणतालिकेत गुण नोंदवताना घोळ होत असतो. त्यामुळे शीर्षकात वेगळेपण असावे.

  • Log in or register to post comments
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा

समीक्षक

सोमवार, November 20, 2023 - 09:13
Permalink
New

लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 5702 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 1 सदस्य उपस्थित आहेत.
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 52 *
Who's new नवीन सदस्य
  • Nisha kale
  • ujjwalashinde9…
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार

Recent comments ताजे प्रतिसाद

  • मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
    2 hours 12 minutes ago
  • 'कुऱ्हाडीचे दांडे' या…
    5 hours 57 minutes ago
  • या कवितेत बोली भाषेतील गोडवा…
    6 hours 1 minute ago
  • कवी दत्तात्रय गंगाराम वालेकर…
    6 hours 4 minutes ago
  • कवी मधुकर श्रावण दुफारे…
    6 hours 5 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 9
कोरोनावर प्रभावी प्राणायाम? - भाग १० 9
गरीबी कशामुळे? 9
अशीही उत्तरे-भाग-३ 9
IT कार्यशाळा - लेखन कसे करावे? - भाग-१५ 9
कु-हाडीचे दांडे 9
कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी 9
मी मराठी - स्पर्धा विजेती गझल 9
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 9
गीत : तू जाण माणसा, सुजान माणसा 9
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२ : निकाल 9
फुलू दे शिवारी 8
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 8
श्याम सावळासा - अंगाई गीत ।।११।। 8
लढू गड्यांनो 8
तुझ्याविना शेती नाही 8
खरं प्रेम 8
प्रतिनिधी नोंदणी : १४ वे महाबळेश्वर साहित्य संमेलन 8
नाचू द्या गं मला : लावणी ॥२६॥ 8
जात्यावरची गाणी 7
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 26,000
कान पकडू नये 25,897
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,753
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,585
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,382
माय मराठी स्तवन git 25,350
एवढा मोठा नांगूर... 25,102
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,086
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,048
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,964
कापसाचा उत्पादन खर्च 24,491
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,426
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,043
सदस्यत्व कसे घ्यावे? 24,009
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,967
शेतकरी पात्रता निकष 23,964
शेतकरी प्रकाशन 23,935
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,901
हे गणराज्य की धनराज्य? 23,865
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,750
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini