कु-हाडीचे दांडे
पिढ्यान् पिढ्या
उंदरासारखी माती उकरून
शेतकरी मेले
अच्छे दिन दावले
राजे हो, अच्छे दिन दावले!
दोन रुपये टमाटे होताच
तुम्ही ' मन मन ' घेतले अन्
रक्त आमचे फ्रिजवून
सॉस तुम्ही ओरपले!
शेतीने माती केली म्हणून
कुणबी भाव मागाय गेले अन्
गोळ्यांचा वर्षाव करून तुम्ही
आमचे प्राणच की हो घेतले!
अरे, पगार, भत्ते, कमीशन हप्ते
वर पाचच वर्षांत पेन्शन!
आणि हयातभर तुम्हास जगवून
आम्ही पेन्शन मागताच
तुमच्या तोंडास मुचके!
तुम्ही तर कु-हाडीचे दांडे की रे
कु-हाडीचे दांडे!
