बा बळीराजा...
आत्महत्या उत्तर नसते
गळ्या हे समजून घे...
पेटून उठ अन् व्यवस्थेले
खनखनित उत्तर दे... ||ध्रृ||
तुह्या घामानं पिकतील मोती
दुनिया होईन खातीपिती
तुच पोशिंदा दुनियेचा या
दान अन्नाचे दे ... ||१||
छातीले माती लावनाराची
जात असे भाऊ कास्तकाराची
करून हात दोन संकटासंग
घे लढाई जिंकून हे... ||२||
परिवाराचा खांब गळ्या तू
तुह्या खांद्यावर संसारी जू
लाथ मारू तथी काळू पानी
जान हा मंतर रे... ||३||
मरनानं हे प्रश्न न सुटतील
मेल्यावर तू त्याले फाटे फुटतील
चिल्ल्यापाल्ल्यायसंग घरधनीनचा
ईचार करून घे... ||४||
हिम्मत ज्याच्या मनी रे वसते
इच्छा जथी, तथी मार्ग हा दिसते
पंखाले या गरूड झेपेची
आस तू असू दे... ||५||
निलेश जगदेवराव देवकर.
मु.पो. डोंगरगांव,
ता.जि. अकोला. पीन -444104
मो.क्र. 9604919343
email- nileshdeokar35@gmail.com

प्रतिसाद (2)
कवी निलेश जगदेवराव देवकर…
डॉ. मीरा पंडित
कवी निलेश जगदेवराव देवकर यांनी अत्यंत साध्या, परंतु थेट काळजात उतरणाऱ्या वऱ्हाडी/ग्रामीण बोलीभाषेचा वापर करून शेतकऱ्यांच्या मनातील व्यथा आणि जगण्याची जिद्द अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.
या रचनेची काही खास वैशिष्ट्ये:
• आश्वासक आणि सकारात्मक संदेश: "आत्महत्या उत्तर नसते... पेटून उठ अन् व्यवस्थेले खनखनित उत्तर दे," या ओळी नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या बळीराजाच्या मनात लढण्याची नवी आग चेतवतात.
• मातीशी नाळ जोडणारी भाषा: 'छातीले माती लावनाराची जात असे भाऊ कास्तकाराची' आणि 'लाथ मारू तथी काळू पानी' यांसारखे अस्सल ग्रामीण शब्दप्रयोग कवितेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
• भावनिक ओलावा: 'चिल्ल्यापाल्ल्यायसंग घरधनीनचा ईचार करून घे' या ओळीतून कुटुंबाची जबाबदारी आणि नात्यांची वीण अत्यंत हळुवारपणे, पण तितक्याच ठामपणे मांडली आहे.
• गेयता आणि तालबद्धता: कवितेची चाल आणि यमक रचना इतकी सुंदर आहे की, ती वाचताना मनात रुंजी घालते आणि थेट अंतर्मनाला साद घालते.
संकटांचा सामना करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला धीर देणारी आणि त्यांना त्यांच्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी ही एक अतिशय प्रेरणादायी कलाकृती आहे.
मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,आपण…
निलेश देवकर
मा.डाॅ.मीरा पंडीत मॅडम,
आपण माझ्या 'बा बळीराजा' या रचनेला दिलेली प्रतिक्रिया ही निश्चितच प्रेरणादायी आहे. आपण अगदी तपशिलवार, सखोल आणि अतिशय सुक्ष्म निरीक्षणाअंती दिलेल्या या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.