नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कथा
व्यवस्थेचा बळी
शालीकराम धोटे हा कोरडवाहू शेतकरी.आता मात्र वयमानानुसार थकला होता. आजारपणात जीवनसंगीनी सोडून गेल्याने त्याचं मन कायच्यातच लागाचं नाई.त्याले तीन लेकरं होते.मोठा शामराव दुसरा मोतीराम व मुलगी मीरा.मीरा लग्न होऊन नांदाले गेली होती.दोन्ही पोरयचे लग्न लावून देलले होते. मोठा पोरगा शामराव व सुनबाई कांता दोघही समझदार होते. लायण्या मोतीरामची बायको अलका थोडी हट्टी होती, पण मोठा मुलगा व सून घर संभाळून नेईन याची शालीकरामले खात्री होती.एक दिवस शालीकरामनं दोन्ही पोरयले बलावलं अनं सांगतलं पोरयहो आतापर्यंत म्या कास्तकारी सांभाळली.येच्यापुढं मले काही काम होणार नाई. मोतीराम,शामराव तुम्ही एकमेकाच्या सल्ल्यानं शेत संभाळा. दोघयनही माना डोलवल्या.दोघही वावरात खूप मेहनत कराचे.वावरही चांगलं पिकत होतं.खर्चपणी जाऊन चार पैसे उरत होते;पण लायण्या मोतीरामच्या बायकोनं कुरापती कराले सुरवात केली.त्यामुळं दोघाभावात मतभेद व्हाले लागले. लायण्यानं हिस्सा मांगतला. शामरावनं वादविवाद न करता त्याले हिस्सा देऊन टाकला.आता दोघं भाऊ वेगवेगळे शेती करत होते.मोतीराम बायकोच्या मताचा असल्यानं त्यानं थोड्याच दिवसात वावर इकलं.शामराव व त्याची बायको मात्र रात्रंदिवस वावरात कष्ट कराचे.वावरातलं उत्पन्न वाढाले लागलं तसं त्यानं वावरात हिर खांदली,हिरीले चांगलं पाणी लागलं.नवीन मोटरपंप बसवला,कोरडवाहू वावर आता ओलताखाली आलं. तेच्यात शामराव व कांता यांना देवकी,नमा व संजय नावाचा मुलगा झाला.त्यांचं कुटूंब खाऊन पिऊन सुखी होतं.शामराव व कांता बैठकीत बसले होते.लेकरं तयारी करून शाळेत गेले. तुले एक सांगू कांता, "सांगाना" "आपल्याले गरीबीमुळं शाळा शिकता आली नाही,पण आता लेकरयले खूप शिकवाचं.आपले लेकरबी हुशार हाये.तेयले काहीच कमी पडू द्याच नाही." "बिलकूल मह्य%E