Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २५ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

मग मात्र लिहावीच लागते कविता...

Main page content

Raosaheb Jadhav
By Raosaheb Jadhav | 9:39 PM IST, गुरू September 27, 2018

मग मात्र लिहावीच लागते कविता...

मी उतरतो विहिरीत
हातावर शरीर तोलत
काठावरील झाडाला बांधलेल्या जुन्या नाड्याच्या धरून पदराला...

सुखरूप पोहचलो तळात
की, मनातच मानतो आभार
नाड्याचे आणि झाडाचे...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
तेव्हा मी तुटून लोंबकळू लागलेला नाड्याचा पदर सांधत असतो
मनातच...

फुटबॉलमध्ये पाइपच्या
गुतलेला काढून
कचरा मला पुन्हा चढायचे असते
त्याच नाड्याने वर
आणि...
चढताना वाचवायचे असते डोके
हलणाऱ्या नाड्याभोवती घुटमळणाऱ्या दगड़ाने
आपली जागा सोडल्यास कदाचित...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
गरम डोक्याचे फडके सोडायचे असते मला पोचताच काठावर...

बटण दाबतो स्टार्टरचे
तोंडाला कान लावतो पाइपाच्या
घेतो कानोसा पाण्याच्या चढण्याचा
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
मला पुन्हा हलवायचा असतो
पांगळा पाइप
पुन्हा एकदा...

अगदी तेव्हाच दिसते जेव्हा,
विजेच्या विक्षिप्तपणाच्या
तडाख्याने जळून काळवंडलेली
माझी इलेक्ट्रीक मोटार...
पण म्हणून मी नाही लिहीत कविता तरीही
कारण,
मला कायदा समजू लागलेला असतो...
माझ्याच कागदी सुरक्षेचा...
आणि ठोकतो एकदा बळहीन बोंब...
जाळणाऱ्यांचे पाप माझ्या बोकांडी टाकणारांच्या नावाने
पुन्हा एकदा...

तशातच
कविता माझी
प्रश्नांची टोपली घेते डोक्यावर
आणि जाते शासनदरबारी
फिरते विचारत जाब देवादिकांना...
कधी चीड़त...कधी रडत...

एव्हाना मी मोटार
खांद्यावर घेतलेली असते
रिवाइंडिंगवाल्याकडे नेण्यासाठी...
आणि गुणगुणत चालतो मनातच-
"कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे..."

अनवानी पायाने परतलेली माझी कविता
बांधावर उभी राहून
माझ्याच अंगावर सोडते कुत्रे
व्यवस्थेचे...

मी मात्र वाढवतो वेग चालण्याचा
कारण,
मला काळजी असते पीकपाण्याची...

मग ती अनावर हळवी होते
आणि सांगू लागते मालकी
माझ्या ओझ्यावर...
मी थकू नये
असं तिलाही वाटत असावं
कदाचित...

मग मात्र लिहावीच लागते कविता
कारण,
जगण्याचा एक हात पुढे करत असते ती
आशावादाचा...

रावसाहेब जाधव (चांदवड)
९४२२३२१५९६
rkjadhav96@gmail.com

पद्यलेखन स्पर्धा-२०१८
पद्यलेखन स्पर्धा-२०१८
छंदमुक्त कविता
Dhirajkumar B Taksande

Dhirajkumar Taksande

शनीवार, October 6, 2018 - 14:55
Permalink
New

अप्रतिम छंद रचणा ....!!! जाधव सर.,
मग तर द्यावा लागतो प्रतिसाद......

  • Log in or register to post comments
कवितेविषयी

Raosaheb Jadhav

गुरुवार, October 11, 2018 - 20:05
Permalink
New

धन्यवाद सर
अगदी मनापासून!

  • Log in or register to post comments

In reply to Dhirajkumar B Taksande by Dhirajkumar Taksande

कविता

ravindradalvi

मंगळवार, October 9, 2018 - 11:37
Permalink
New

जबरदस्त वास्तववादी ...
जगण्याचा एक हात पुढे करत असते ती
आशावादाचा... रावसाहेब जाधव सर

  • Log in or register to post comments
कवितेविषयी

Raosaheb Jadhav

गुरुवार, October 11, 2018 - 20:06
Permalink
New

धन्यवाद!

  • Log in or register to post comments

In reply to कविता by ravindradalvi

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.

गंगाधर मुटे

मंगळवार, December 25, 2018 - 13:18
Permalink
New

प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
*congrats* :congrats:

  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 10838 views
प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • admin
  • surekha
  • निलेश देवकर

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 135 *
Who's new नवीन सदस्य
  • Seema Bhamare
  • मधुकर
  • P D Katkar
  • Salonimestri2026
  • Anand kadam

Recent comments ताजे प्रतिसाद

  • सकाळी *तांब्या* घेऊन
    8 hours 41 minutes ago
  • सन्माननीय महोदया आपण दिलेला…
    23 hours 57 minutes ago
  • (विषय दिलेला नाही)
    1 day ago
  • साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
    1 day ago
  • अतिशय संवेदनशील रचना!
    1 day ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
विश्वास आणि विश्वासघात 5
संपर्क/सुचना/अभिप्राय 5
नियोजन : ११ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन, नाशिक 5
जात्यावरची गाणी 4
जीवन एक शेती 4
कोण तुम्ही व्हा रं ? 4
शहरी माणसाच्या नजरेतून... दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... 4
ऋणानुबंध 4
kawita 4
घेऊ नको फाशी .......! 4
कर्जबाजारीपणाची व्यथा सांगणारी कथा 4
शुभारंभ 4
मातृत्वाचा शृंगाररस 4
कार्यक्रम पत्रिका : १५ वे अ. भा. ONLINE मराठी शेतकरी साहित्य संमेलन 4
शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे 4
केवळ जंतूमुळे रोग होतो? : भाग १३ 4
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१७ : निकाल 4
लढू गड्यांनो 4
मराठी गझलेतील नवे शैलीप्रवाह 4
हूसास 4
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
आता गरज पाचव्या स्तंभाची 25,988
कान पकडू नये 25,873
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती 25,742
माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता:कवी इंद्रजित भालेराव 25,553
सलाम नाबाद २००! - तुंबडीगीत ॥३३॥ 25,341
माय मराठी स्तवन git 25,336
सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) 25,068
एवढा मोठा नांगूर... 25,063
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल 25,031
‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ 24,959
कापसाचा उत्पादन खर्च 24,487
What went wrong with Independence? - Sharad Joshi - Chapter - 2 24,414
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ 24,024
सदस्यत्व कसे घ्यावे? 23,977
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत 23,944
शेतकरी प्रकाशन 23,934
शेतकरी पात्रता निकष 23,928
बळीराजाचे ध्यान : अभंग ।।४।। 23,892
हे गणराज्य की धनराज्य? 23,829
रानमेवा प्रस्तावना - मा. शरद जोशी 23,737
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini