आयकायला किती वेगळं वाटतं ना,
म्हणजे ज्याचा बळी जातो तो राजा!
मला तर सध्या असंच वाटतं,
की हाच तो बळीराजा!
काय करून टाकलंय आपण
या बळीराजाचं?
जो संपूर्ण जगाचं पोट भरतो,
तो स्वतः मात्र उपाशी मरतो!
म्हणून म्हणावंसं वाटतं,
बळी जाणारा राजा हाच तो बळीराजा!
जगात किती सुंदर काम आहे ना शेती,
याच शेतीतून पीक घेऊन आपण जागाच
पोट भरतो.
जगाच्या वाटेला आपण अन्न देतो,
मात्र स्वतः च्या वाटेला फाशीचा फंदा येतो.
जी शेती लोकांना दोन वेळचं जेवण देते
जगण्याची ऊर्जा देते,
ती म्हणजे शेती!
मात्र तीच शेती करायला
आज कंसतरी वाटू लागलंय,
कधी पाणी मिळत नाही
तर कधी पीक येत नाही!
आणि एवढ्या संकटातून पीक आलं
तर त्याला योग्य भाव मात्र मिळत नाही!
मग काय करावं बळीराजानं?
जिथे निसर्ग पाणी देत नाही,
तिथे सरकार भाव देत नाही!
हाच तो बळीराजा
जो संपूर्ण जगाला अन्न देतो,
पण स्वतः मात्र उपाशी मारतो!
मग तुम्हीच सांगा,
याला बळीराजा म्हणावं
की बळी जाणारा राजा?
लेखक : प्रतीक खोडपे

प्रतिसाद (1)
साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत
डॉ. मीरा पंडित
प्रतीक खोडपे यांनी अत्यंत साध्या, सहज पण तितक्याच धारदार शब्दांत बळीराजाच्या जगण्यातील दाहक वास्तव मांडले आहे. 'बळी जाणारा राजा हाच तो बळीराजा' ही संकल्पना वाचताच अंगावर शहारे येतात आणि कवितेचा संपूर्ण आशय एका क्षणात मनात उतरतो.
जगाचे पोट भरणारा पोशिंदा स्वतः मात्र संकटांच्या आणि हतबलतेच्या खाईत कसा अडकला आहे, याचे अत्यंत हृदयद्रावक चित्र कवीने डोळ्यांसमोर उभे केले आहे. "जिथे निसर्ग पाणी देत नाही, तिथे सरकार भाव देत नाही" ही ओळ आजच्या शेतकऱ्याची अगतिकता आणि व्यवस्थेपुढील त्याचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करते.
कोणत्याही क्लिष्ट शब्दांचा आधार न घेता, थेट संवादात्मक शैलीत केलेली ही मांडणी प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. या अत्यंत ज्वलंत आणि भावस्पर्शी विषयाला इतक्या ताकदीने शब्दबद्ध केल्याबद्दल कवीचे मनापासून अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!