यमन/ देश ,... दादरा
१५/०८/२०२० ✍🏻@संदीप
डोळे असणार सोडा, नसणारा सुद्धा चाचपडून पाहतो
मुळात जिथे विश्वास असतो, तिथेच विश्वास घात होतो
का करावा? आणि कुणाचा? कुणी सांगेल का बरं मला
कुठून येतो? कुठ जातो? माहीत कुणाला कुठ तो राहतो?
प्रेम म्हणजे विश्वास की विश्वास म्हणजे प्रेम, एक कोडंच
का चुंबकाचे दोन ध्रुव ती,, एक उत्तर एक दक्षिणेला जातो?
सर्व आयुष्य निघून जात, थोडासा विश्वास कमवायला
आयुष्यभराच्या मेहनतीला क्षणात कसा बरं तडा जातो.
निघून जात कुणाच सर्वस्व सहज हातातल्या वाळू सारखं
प्रश्न पडतो जीवाला हा विश्वास निघून गेल्यावर कुठ जातो.
