सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही
असते कशी शहादत पाहून या तुम्ही.
सीमेवरी जराशे जाऊन या तुम्ही.
नंतर करा जगाला रोशन कधी तरी,
घर आपले अगोदर बारून या तुम्ही.
तुमच्या खुळेपणाला फळ लागले खुळे,
आतातरी हुशारी पेरून या तुम्ही.
भगवा निळा नि हिरवा एकत्र या इथे,
हा आपला तिरंगा फडकून या तुम्ही.
'खचलेत मृत बळीचे परिजन अशा क्षणी,
'रविपाल ' जा तयांना भेटून या तुम्ही.
• गज़लकार •
डॉ. रविपाल भारशंकर, हिंगणघाट जि. वर्धा.
• अक्षर गणवृत्त •
विद्युल्लता
• लगावली •
गागालगा लगागा गागालगा लगा
Comments
खूप छान सर
खूप छान सर
धन्यवाद राजेश!
खूप खूप आभार राजेश.
Dr. Ravipal Bharshankar
अप्रतिम!!!
अप्रतिम गझल डॉ साहेब!!!!
धन्यवाद धिरज भाऊ.
खूप खूप आभार आपले.
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
*bq*
Dr. Ravipal Bharshankar
सर्वांचे मनःपूर्वक आभार
*bq*
Dr. Ravipal Bharshankar
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings