Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




जागतिक दर्जाच्या हवेतील वाढदिवस

जागतिक दर्जाच्या हवेतील वाढदिवस

मागील वर्षीचा माझा वाढदिवस २४ तासाच्या ऐवजी साडेवीस तासांचाच होता. २७/०२/२०१९ ला मी इस्त्राईल मध्ये होतो. इस्त्राईलचे घड्याळ भारतापेक्षा साडेतीन तास मागे असते. 
म्हणजे असे की माझी २७ तारीख सुरुवात झाली आणि माझा मेनी मेनी हॅपीवाला सुदिन सुरु झाला तेव्हा इजरायल घड्याळात रात्रीचे १२ आणि  भारतीय घड्याळात पहाटेचे साडेतीन वाजलेले होते. 
मी २७ तारखेलाच इजरायल वरून भारताकडे निघाल्याने माझ्या त्या दिवसाची सुरुवात इजरायलघड्याळानुसार झाली आणि त्याच दिवशी भारतात पोचल्याने माझ्या २७ तारखेचा समारोप भारतीय घड्याळानुसार झाला. म्हणजे माझी २७ तारीख दोन्ही देशांच्या प्रमाणवेळेचा हिशेब करता २४ तासाऐवजी फक्त २०.३० तासांचीच होती. काही का असेना हा वाढदिवस मात्र माझ्यासाठी विस्मरणीय झाला. त्याचप्रमाणे २७ तारखेला माझा इज्राएल, इथोपिया आणि भारताच्या भूपृष्ठाला चरणस्पर्श झाल्याने  हा वाढदिवस जागतिक दर्जाचा ठरला, असेही म्हणावे  लागेल. Lol Lol 
 
खरं त्यादिवशी माझा वाढदिवस आहे हे कुणालाच माहित नव्हते. मी स्वतःहून सांगण्याचे तर अजिबातच प्रयोजन नव्हते. दिवसभर सतत  विमानात असल्याने देशातून कॉल येऊन त्या चर्चेतून सुगावा लागण्याची शक्यता नव्हती. 
 
पण..... 
 
पण फेसबुकने चुगलखोरी केली. इथोपियाला विमान बदलण्यासाठी थांबलो असता नेट कनेक्शन मिळाले आणि तीच संधी साधून ही "केकबातमी" फेसबुकने सहकारी मित्रांपर्यंत पोचवली. मग काय वाढदिवसाचा समारंभ अगदी हवेत म्हणजे विमानातच पार पडला.
त्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानायचे राहून गेले होते. आज संधी मिळाली. इज्राएल अभ्यास दौऱ्यातील सर्व सहकारी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार.
 
- गंगाधर मुटे
========

birdh day

Birth day

Share