

आठोनिच्या झुल्यावरं.......(वऱ्हाडी बोली)
आठोनिच्या झुल्यावरं
गेला पाऊस नाचुनं
सर्दावल्या त्या मनाले
देल्ली अंगार लावून
गच्च चिखोलं भरल्या
पाय फसनीच्या वाटा
हातातल्या मेंदीसाटी
कायजाचा आटापिटा
जरा लवली पापणी
केला इशारा तो खोटा
गेला पायात खुळूनं
हिर्वा अनिदार काटा
सल काट्याची उरातं
अस्यी काई उसयली
त्याले कोरता कोरता
उभी बंदी इरयली
धाकधूक अंधाराची
दोनी अंगात भिनली
ओली खवंद काटयांची
भरपावसातं न्हाली
पांदनीच्या आळवाटा
कस्या कानोकानी गेल्या
हटखोरावानी साऱ्या
काटा काळाले लागल्या
आठोनीच्या झळीसंग
मन चिंब चिंब न्हालं
जूनं जाणतं कुरूप
आज हिर्वगारं झालं
रविंद्र अंबादास दळवी
२०२ श्री. वल्लभ अपार्टमेंट विधाते नगर
पखाल रोड,वडाळा शिवार, नाशिक ४२२००६
९४२३६२२६१५, ravidalvi7@gmail.com
Comments
श्रीमान दळवीजी,
Narendra Gandhare
श्रीमान दळवीजी,
Narendra Gandhare
श्रीमान दळवीजी,
Narendra Gandhare
श्रीमान दळवीजी,
Narendra Gandhare
सर्दावल्या... व्वा काय सुंदर
शेतकरी तितुका एक एक!
Pages
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी
सदस्य प्रवेश
सदस्य खाते
User Details
आज सर्वाधिक वाचन
Pages
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
Pages
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
सध्या साईटवर हजर सदस्य
There is currently 1 user online.
Layout Settings