नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

मरणवेध

मुक्तविहारी's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखन स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
छंदोबद्ध कविता

मरणवेध

सारेच कसे हे । भकास उदास
जगण्याची आस । मिटलेली

चिंब भिजण्याचे । नाही नशिबात
विझलेली वात । आभाळाची

हरित पर्णेही । झालेत पाचोळा
जीव घोटाळला । वादळात

वरतून सारे । ऊन तापलेले
श्वास वाफलेले । आत आत

कुणाला मागावे । कशाचे रे दान
त्यांचेही ते पान । चोळामोळा

- मुक्तविहारी
ई १२/७२, थर्मल काॅलनी,
परळी वैजनाथ - ४३१५२०.
मो.९८६०९८५९११.

Share

Comments

Layout Settings