किती दिवसांनी
✨✨किती दिवसांनी✨
✍🏻@संदीप, वृत्त_भृंग
व्युत्क्रम गझल - या गझल प्रकारात रदीफ हा काफियाच्या अगोदर येतो, असा हा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रकाराला व्युत्क्रम गझल असे नाव दिले.
या प्रकारावर वाचकांनी आणि समीक्षकांनी आपले अभिप्राय कळवावे.
गझल :-
बघ परत भरून आले हे आभाळ किती दिवसांनी,
खरंच मिटेल हा कोरडा दुष्काळ किती पावसांनी.
चिट पाखराविना ओसाड आठवणीतले गाव,
निर्दयीपणे ओरबाडले रान-माळ किती माणसांनी.
विझून गेल्या चुली घरच्या मुकी झाली अंगणे,
कुठवर मळावी आम्ही कणिक अन् किती आसवांनी.
किती आशेने डोळे लावून बसलीत जुनी खोडं,
निघून जाईल संकट असलं जरी किती आसमांनी.
एवढी वर्षे फक्त तुझ्याच आशेवर जगत राहिलो,
संदीप अजून काय बघाव अन् किती डोळ्यांनी.
संदीप
ता कळमनुरी
9049143654
- Read more about किती दिवसांनी
- Log in or register to post comments
- 5 views
