Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे.

Main page content

By Manjusha sanja… | 8:53 PM IST, गुरू November 26, 2026
महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण

पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे.
जे जे अव्यक्त, अस्पष्ट, अदृश्य आहे त्या सर्वांची जाणीव होते पण अंतर्मनात भावनांची प्रचंड घालमेल चालू असते आणि एका अस्वस्थ क्षणी कागदावर त्या वादळाचे ठसे उमटवतात. हीच अव्यक्ताची वादळे कवितासंग्रहाच्या रूपाने वाचक रसिकांच्या पुढ्यात येतात.
अतीव कोरीवकाम केलेली, विलोभनीय, देखणी, सकस कविता 'अव्यक्ताची वादळे' या संग्रहाच्या निमित्ताने प्रसिद्ध साहित्यिका संजीवनीताई बोकील यांनी साकारली आहे.
ज्यांना सहज शब्दाचे दान पडते अशा शब्दवैभवी, प्रतिभासंपन्न साहित्यिका माननीय संजीवनीताई बोकील यांचे एकूण 29 पुस्तके त्यांच्या विविध अंगी साहित्य प्रवासाची साक्ष देतात. त्यांच्या कवितेचे गारुड तर संबंध साहित्य विश्वात आहे. यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या 'हिरव्या सुक्ताच्या प्रदेशात', 'वडिलांचे मुलीस पत्र', 'काळीज कुप्पी', 'एकांतरेघेवर' यासारख्या कवितासंग्रहाने मिळवलेली रसिक प्रियता त्याची साक्ष देते.
एकूण साठ कवितांचा समावेश असणाऱ्या या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. संग्रहातील पहिलीच कविता ह्या काव्य अनुभवाच्या वाटेवर जाताना कसं जावं ते शिकवून जाते.
'या बसा या होडीत...' अशी सुरुवात करत पुढे कवयित्री सांगतात,
'डोळे तेवढे बरोबर घ्या
रंगाचे चष्मे नकोच
वणवे दिसत नाहीत त्यातून
कान काढून ठेवा
त्याचा उपयोग नाही
जंगलातले ध्वनी ऐकण्यासाठी....
मी बोटाने दाखवीन
काजव्यांचे शहर,
पाचोळ्या खालचे बहर
पारंब्याची झाडे, लपलेल्या गुहा
वारूळातले कहर
मौनाच्या कातळाखालचे
निरुपाय पाझर
किनारा टाळणाऱ्या लहरी....'
ही कविता खरं तर काव्य वाचण्याची आपली नजर बदलून टाकते. निर्विकार बालमनाच्या अंत:चक्षुंनी बघायची असते कविता आणि व्यवहारी जगाचे पापुद्रे सारून अनुभवावे लागते कवितेचे विश्व. ही जाणिव जगाला करून देणारे मूल्यबळ शिकवणारा हा उच्च कोटीचा कवितासंग्रह आहे.
एका कवितेत तर त्या असही सांगतात
'झाडाने जितके सहज
सोडून द्यावे पाण्यावर
जाळीदार पान
तशी सोडून द्यावी कविता
वाचत्या डोळ्यांच्या
जिवंत झऱ्यात....'
किती सहज, सोपं पण तितकच गुढ आणि अवघड तत्त्वज्ञान कवयित्री सांगून जातात!
कविता कशी असावी? कशी वाचावी? कशी पहावी? याचे सुफळज्ञान कवयित्री ह्या संग्रहात देऊन जातात.
या काव्य संग्रहात साहित्य वाचनाची जाण देणाऱ्या कवितेसोबतच समाज भान राखणाऱ्या, जगण्याची शिकवण देणाऱ्या आणि निसर्गाशी आपले नाते सांगणाऱ्या ही कविता आहेत.
'मोगरा', 'सांग ना रे', 'पावलापुरता उजेड', 'नाते', 'समज', 'बरे झाले' यासारख्या कविता अंतर्मनाशी गुढ संवाद साधत जगण्याचे भान देतात.
तर 'एक तरी भेट', 'निर्वाणधुन', यासारख्या कविता विश्वकर्त्याला काहीतरी मागणे मागताना दिसतात. 'अर्जन विसर्जन' ही कविता तर माणसाला माणूस बनण्याच्या प्रक्रियेचे विश्वकर्त्याला पसायदान मागताना दिसते
'वसो माझ्यामध्ये
असे गुजभर रामत्व
की निष्ठांन्नापरिस लागो
जीभेला उष्ट्या बोराची
भाबडी चव अपूर्व....'
माणसातील स्वार्थ, न्यूनगंड गळून जावा आणि परोपकार, प्रेम निर्माण व्हावे आणि शेवटच्या क्षणी -
'पंचमहाभूतातच
उरावा फक्त
एक अर्जित मानवी सुगंध
क्षणभर धुम्रवलयात...'
असे आर्त मागणे ही कविता मागतांना चिंतनाची परमोच्च पातळी गाठत असल्याचे जाणवते.
ही कविता प्रतिमा लावण्याने ओतप्रोत असूनही परिवर्तनाचा अभ्युदय करणारी व मौलिक समाजभान जागे करणारी आहे. या कवितांमध्ये एक गुढ संवाद असला तरीही प्रांजळ अनुभव संपन्नता आणि जीवनानुभूतीचे दर्शन पदोपदी या काव्यसंग्रहात घडताना दिसते.
निसर्ग हा कवयित्रीचा प्राण सखा असून त्याच्या हातात हात घालून काव्य प्रवास करत असताना स्वप्नाळू मनाचा आविष्कार क्वचितही आढळत नाही, उलट निसर्ग प्रतिमा मधून जीवन जाणिवेचे चिंतन सूत्र अभिव्यक्त होताना दिसते. 'आकाश दिवा', 'जुन्या गावात', 'चित्रकार' यासारख्या अनेक कविता 'निसर्ग' साकारताना दिसतात. असे असले तरी प्रामाणिकतेचा सौहार्द लपेटून ह्या कविता संवेदनशीलतेच्या लावण्याने उजळून येतात. या कविता फक्त शब्दांची आरास न माडंता, फक्त भावनांचे विवेचन न करता वाङमयीन कौल सांभाळत कवितेतील देखणेपण प्रतिबिंबित करतात.
या कवितांमध्ये संसाराकडून परमार्थाकडे जाणारा प्रवास सुद्धा कधी कधी द्रुगोचर झालेला दिसतो तर भक्ती, संघर्ष, जिद्द आणि आत्मपरीक्षणाची नोंद सुद्धा करायला हा कवितासंग्रह विसरत नाही.
साखरेच्या चाचणीत मुरवलेला मोरआवळा मुरत जातो तसतसा तो अधिक चवदार होतो आणि सद्गुण सुद्धा वाढत जातात तसाच हा काव्यसंग्रह. सुरुवातीपासून संयम शिकवत, प्रेरणा देत, आतल्या आत खोल आवर्तन निर्माण करत, संभ्रमाला दूर सारत शेवटी निर्वाणाकडे वाटचाल करतो.
'हरवल्या मी पणापाशी सरलेला चांदव चकवा
कळ्याकरंद फांदीवर एकटेपणाचा झुलवा
मावळत्या अवरोहाशी क्षणघुंगुर झाले गोळा
नसण्याच्या काठावरती असण्याचा चोळामोळा'...
जीवनाचे एक सम्यक तत्त्वज्ञान मांडत असतानाच त्यातील बारकावे आणि विविध पैलू उलगडत सम्यक विचारांचे दर्शन या कविता घडवितात. निराशेला नकार देत आशावाद पेरणाऱ्या या लक्षार्थ आणि गर्भार्थ दोन्हीचे वहन करणारा अतिशय सुदृढ आणि सक्षम असा हा कविता संग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा.

पुस्तकाचे नाव - अव्यक्ताची वादळे
लेखिका - मा. संजीवनी ताई बोकील
प्रकाशक - अनुबंध प्रकाशन पुणे
मूल्य - ३००/-

  • Log in or register to post comments
  • 5 views

प्रतिसाद (1)

धन्यवाद

Manjusha sanja…

गुरुवार, November 26, 2026 - 20:56
Permalink
New

धन्यवाद

  • Log in or register to post comments

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,285 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,181 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,240 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,024 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,494 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,383 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,218 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,840 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,109 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,004 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,274 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,249 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,271 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,436 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 3 सदस्य उपस्थित आहेत.
  • Manjusha sanja…
  • admin
  • भालचंद्र डंभे

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 42 *
Who's new नवीन सदस्य
  • Manjusha sanja…
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • खूप खूप धन्यवाद
    3 minutes 34 seconds ago
  • धन्यवाद
    11 minutes 12 seconds ago
  • खूप खूप साभार आपले. आपल्या…
    1 hour 39 minutes ago
  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    5 hours 36 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    7 hours 48 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 258
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 84
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 83
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 82
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 81
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 72
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 62
कापला रेशमाच्या सुताने गळा 57
किती चाटणार भारतपुत्रा? 53
आजचे शेतमालाचे बाजारभाव 40
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 37
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी' 37
वावर 33
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 18
कच्ची कार्यक्रमपत्रिका : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 17
किसान क्रांती 16
माझे फेसबूक स्टेटस-1 13
गझल 12
दुःख मातीतले.... 12
अट्टाहास 12
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,021
माझे फेसबूक स्टेटस-1 180,999
शुभारंभ 134,918
रानमेवा - भूमिका 109,389
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,404
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,722
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,546
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,836
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,587
उद्देश आणि भूमिका 77,456
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,648
विचारपूस 71,738
गणपतीची आरती ॥३५॥ 67,756
सत्कार समारंभ : वर्धा 66,737
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,330
किती चाटणार भारतपुत्रा? 61,845
जात्यावरची गाणी 56,023
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,435
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,048
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,357
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini