मृगजळ
तु एक मृगजळ
मी एक तृष्णा
जी कधीही...
तुष्ट होत नाही...
असंतुष्ट...
होण्याचे भाग्य घेऊन
हिंडत रहाते...
रानावनात....
वाळवंटात....
जिथल्या...
प्रत्येक कणात...
मी शोधते तुला...
पण तु....
नेहमी सारखाच...
माझ्यातली...
तृष्णा वाढवून...
पडद्या मागे...
जाऊन....
पडद्या वरचे सर्व सुत्र हाती घेऊन...
फक्त नाचवत असतोस
मला....
एखाद्या कठपुतली सारखं...
आणि मी ही नाचत
जाते....
अंतिम...
दृश्यातील...
सुखांत होण्यासाठी...
माहिती नाही
मलाही...
माझ्या जीवनातील
नाटकात...
सुखांत....
दडलेला आहे...
की दुखांत....
पण....
वेड्या आशेने
झपाटलेली मी....
नेहमी माझी मान
तुझ्या खांद्यावर ठेवते....
पण तुझे हात फिरत जातात...
माझ्या ओठांकडून
वक्षांकडे....
तरीही माझ्यातली...
विश्वासाची मान मी...
तशीच...ठेवते....
यासाठी की
बदलावर ..माझा विश्वास आहे...
आणि
त्याला मिळते संधीची एक मालिका....
तो अविरत...
प्रयत्न करत असतो....
देहाच्या....
देह धर्माला न्याय देण्यासाठी...
आणि मी
निपचित पडलेली असते...
देहाच्या भाषेचा अर्थ
समजून घेत...
जो शेवटपर्यंत
समजत नाही...
पण...
होत राहतात....
माझ्यावर...
कित्येक विनयभंग...
आणि
बलात्कार ही...
ज्याला कधीच
बोलल जात नाही...
फक्त
सहन केले जाते...
नात्यांच्या....
सोयिस्कर....
मुलाम्याला अढळ
ठेवण्यासाठी....
डॉ. राजश्री तावरे
०४/१२/२०२२
- Read more about मृगजळ
- 4 comments
- Log in or register to post comments
- 44 views

प्रतिसाद (4)
छान
RANGNATH TALWATKAR
छान
हार्दिक आभार
Rajshree
आपली प्रेरणा महत्त्वाची
प्रतिक्रिया
RANGNATH TALWATKAR
छान
छान रचना
anjaliwaghmare…
छान रचना