Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




नियतीला हे मंजूर नसावे...

लेखनविभाग: 
लेखाचे समीक्षण
पण नियतीला हे मंजूर नसावे...
 
        शेतीमातीशी आपली नाड जोडणारे, शेती-शेतकरी-शेतीसमस्या या त्रिसूत्रीला बांधील असणारे, उच्चविद्याविभूषित असूनही नोकरी ना करता आपल्या काळ्या आईच्या सेवेचे आणि बळीराजाच्या विकासाचे व्रत हाती घेतलेले श्री. गंगाधर मुटे लिखित 'गंधवार्ता एका प्रेताची' हा लेख म्हणजे वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा, त्यांना विचारप्रेरीत होण्यास प्रवृत्त करणारा लेख आहे. हा लेख त्यांच्या शेतीनिष्ठ जीवन जाणिवांच्या प्रामाणिक अभिव्यक्तीचे एक जिवंत उदाहरण आहे.
 
        'गंधवार्ता एका प्रेताची' या लेखाच्या शिर्षकावरूनच या लेखात दडलंय तरी काय? अशी जिज्ञासा मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. पुढे काय? यापुढे काय? असे करत शब्द न शब्द हृदयाचा ठाव घेत राहातो. त्यामागील कारण म्हणजे वाचकांना खिळवून ठेवण्याची लेखकाची हातोटी असेच म्हणावे लागेल. 'सरळ साधी परंतु वैविध्यपूर्ण भाषा आणि वाचकांच्या थेट मनापर्यंत पोहचण्याची अभिलाषा', हेच या उत्कृष्ट लेखाचे गमक आहे.
 
        या लेखात दोन मित्रांच्या भिन्न जीवनप्रवासाचे वर्णन मोठ्या खुबीने करून दोन जीवनप्रवाह वाचकांच्या समोर लेखकाने प्रस्तुत केले आहेत. भरत गव्हाणकर हा एक उच्चविद्याविभूषित असूनही सुसंस्कारित तरुण असून केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर गलेलठ्ठ पगाराची शासकीय नौकरी सोडून गावात राहायला येतो आणि शेतीचा व्यवसाय पत्करतो. शेतीत नवनवीन प्रयोग करून आपले इच्छित साधण्याचा प्रयत्न करतो परंतु निराशा पदरी पडते. सर्व वडिलोपार्जित संपत्ती शेतीत खर्च करूनही हाती काही लागत नाही. इतिहास बदलविण्याकरिता टाकलेलं पहिलं पाऊल इतिहासाचा पार भूगोल करून जातो. सर्व बँकांची थकबाकी, सावकाराची कर्जबाकी यामुळे त्याची हालत हलाखीची होते. कर्जाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसून त्याला स्वस्थ बसू देत नाही. पण तो नियतीचे वार झेलत न डगमगता मार्ग काढीत पुढे जात राहातो. आपल्या कौशल्याच्या जोरावर टीव्ही, रेडिओ दुरुस्तीचा जोड व्यवसाय स्वीकारतो.
       त्याचवेळी कधीकाळी भरतचा वर्गमित्र असलेला, स्वभावाने खंबीर असलेला, खूप उन्हाळे पावसाळे सोसलेला, निधळ्या छातीचा अर्जुन प्राप्त परिस्थितीशी हतबल होतो.
 
         या लेखातून श्री. गंगाधर मुटे यांनी दोन भिन्न मतप्रवाहाचे दर्शन आपल्या प्रवाही आणि प्रभावी लेखणीच्या साहाय्याने घडविले आहे. दोन भिन्न व्यक्तिरेखा प्राप्त परिस्थितीशी कसा सामना करतात याचे दर्शन घडविले आहे.
 
        दोन मुलींचा बाप असलेला अर्जुन आर्थिक विवंचनेने पोखरलेला, कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने गांजलेला, अगदीच हतबल झालेला. त्याच्याजवळ आठव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीला शालेय गणवेश घ्यायलाही पैसे नाहीत. आज उद्याच्या कालचक्रात तो पुरता फसलेला. लेखकाचे हा गणवेशाचा प्रसंग चित्रित करतानाचे लेखन कसब वाखाणण्यासारखे आहे. तो प्रसंग अंगावर शहारे उभे करतो, प्रत्यक्ष आपल्यासमोरच घटना घडतेय की काय असे वाटत राहते, छोटया मुन्नीची त्या ड्रेसमुळे झालेली अडचण डोळ्याला धारा लावल्याशिवाय राहात नाही.
 
        अर्जुन सव्वीस जानेवारीकरिता मुन्नीसाठी ड्रेस आणायला तालुक्याच्या गावी जातो. पण नियतीला ते मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरतात. गेलेला अर्जुन रिकाम्या हाताने परत येतो. आणि आपण किती हतबल आहोत हा आघात त्याला गळफास घ्यायला प्रवृत्त करतो .घराच्याच अंगणातील बोरीवर अर्जुनचा लटकता मृतदेह पाहून त्याची पत्नी नीलिमा ही सुद्धा गतप्राण होते. आपल्या माघारी दोन चिमुकल्या मुलींना सोडून दोघेही इहलोकीच्या यात्रेला रवाना होतात .
        आपले आईबाबा आता या जगात नाहीत हा कसलाही गंध नसणारी केवळ अकरा महिन्याची त्याची छोटी मुलगी भरतचा हंबरडा ऐकून रडायला लागते.
 
        या शोकांतीकेचे कारण म्हणजे अर्जुन अडत्याला मुलीचा गणवेश घेण्याकरिता उसनवार पैसे मागतो परंतु त्याचे कर्ज यंदाचे पूर्ण पीक त्याला देऊनही फिटलेले नसते. बँका आणि सावकाराची कर्जबाकी तशीच असते. दुकांदारानेही किराणा थांबवलेला असतो, कारण गेल्या वर्षी कोरडा दुष्काळ आणि या वर्षी ओला दुष्काळ एवढाच काय तो फरक असतो.
        पुन्हा एका कुटुंबाने कर्जाच्या विळख्यात गुदमरून आपल्या सर्वांचा निरोप घेतलेला असतो. आणि पुन्हा एका अध्यायाची समाप्ती होते.
        हा लेख वाचताना हा लेख नसून  बळीराजाच्या जीवनावरील अख्खी कादंबरी वाचकांच्या पुढ्यात अवतरते. हीच लेखकाची खरी किमया आहे.
        'गंधवार्ता एका प्रेताची' या लेखाच्या माध्यमातून श्री.गंगाधर मुटे यांनी समस्त समाज आणि शासनव्यवस्था यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. वाचकांना वाचनाभीमुख करणारा तसेच प्रत्येक वाचकांच्या अंतरंगाचा ठाव घेणारा, त्यांना विचार करायला भाग पडणारा हा लेख लेखकाच्या यशस्वितेची पावती देतो. मा.श्री गंगाधर मुटे यांच्या लेखणीला सलाम.
        
        चित्रा कहाते
        22, शिवगिरी हाऊसिंग सोसायटी
        ओमनगर नागपूर - 30

लेखाची लिंक - http://www.baliraja.com/node/1309  - गंधवार्ता एका प्रेताची

Share

प्रतिक्रिया