कधी कळेना मला
हे शब्द का भासले मला?
दूर अंतरी बघून आज,
आले मनी,
सूर हे साजले,
मन माझे हरवले,
जीव हा रंगला
शब्दातूंन उमंगला.
सर्व जग बघून घ्या
म्हणे मला,
आत्मअंतरित हे,
बोलले मला.
शब्द हा घेऊनी,
सांगते मी तुला,
हरवूनी भान मी,
बोलते हे तुला.
शब्द घेऊनी तू,
मांड ना मला.
कधी कळेना मला,
हे शब्द का भासले मला?
गीतकार :प्रतीक खोडपे
माझं स्वतः लिहिलेले गीत
मोबाईल :7620563312

प्रतिसाद (1)
प्रतीक खोडपे यांनी या…
डॉ. मीरा पंडित
प्रतीक खोडपे यांनी या गीतातून अंतर्मनातील तरल भावना आणि शब्दांची जादू अत्यंत संवेदनशीलतेने गुंफली आहे. जेव्हा मन शब्दांच्या आणि सुरांच्या दुनियेत हरवून जाते, तेव्हा होणारी ती सुखद आणि अव्यक्त अवस्था गीतकाराने अगदी सहजतेने कागदावर उतरवली आहे.
"सूर हे साजले, मन माझे हरवले, जीव हा रंगला, शब्दांतून उमंगला" या ओळी वाचताना प्रत्यक्ष एखादी सुंदर धून ऐकल्याचा प्रत्यय येतो. आपल्या अंतरीच्या भावना शब्दांत मांडण्याची आर्त साद आणि आत्ममग्न होऊन केलेला हा संवाद मनाला खूप भावतो. रचनेतील लयबद्धता, नादमाधुर्य आणि मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दांतून साधलेली ही भावयात्रा वाचकाला एका वेगळ्याच शांत आणि सुंदर विश्वात घेऊन जाते.
या अत्यंत हळुवार, तरल आणि मन प्रसन्न करणाऱ्या काव्यरचनेबद्दल गीतकार प्रतीक खोडपे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!