Skip to main content Skip to footer
मुखपृष्ठ

शोध

Main menu

  • ताजे अद्यतन
  • लेखनस्पर्धा-२६
    • समग्र लेखनस्पर्धा 2014 ते 2025
    • Index लेखनस्पर्धा-२०२६
  • विनोदी
  • साहित्य संमेलन
  • नवे लेखन
  • वाङ्मयशेती
  • लोकप्रिय लेखन
  • शेतकरी गीत
  • संक्षिप्त परिचय
  • अनुक्रमणिका

Welcome User Block

🙏 नमस्कार पाहुणे ! शेतकरी, शेती अभ्यासक, रसिक आणि सारस्वतांच्या दुनियेत आपले स्वागत आहे. 🙏

प्रतिनिधी नोंदणी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 
दिनांक : शुक्रवार दि. २५ , शनिवार, दि. २६ आणि रविवार, दि. २७, डिसेंबर २०२६
स्थळ : अ‍ॅग्रीसन FPC परीसर, आर्वी छोटी ता. हिंगणघाट जि. वर्धा
प्रतिनिधी नोंदणी अंतिम तिथी : २७ नोव्हेंबर २०२६
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी 👉  https://baliraja.com/rep-regd
प्रतिनिधि नोंदणी फॉर्म 👉  https://baliraja.com/form/wf-rep-16sss 
कार्यक्रमपत्रिका 👉  https://baliraja.com/kp16

***************

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन 
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २६ नोव्हेंबर २०२६
  • स्पर्धेचे स्वरूप, पारितोषिकाचे स्वरूप, प्रवेशिका सादर करण्याची पद्धत, नियम व शर्ती, याविषयी सविस्तर माहिती येथे >> https://baliraja.com/node/3379 उपलब्ध आहे.
  • सादर झालेल्या प्रवेशिका येथे >> https://baliraja.com/spardha-2026 पाहता येतील.

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे

Main page content

गंगाधर मुटे
By गंगाधर मुटे | 1:44 PM IST, सोम November 16, 2026

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त (१२ डिसेंबर २०२६)  
सादर करीत आहोत.....
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२६ 
लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन
प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी
१६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२६ 
 
या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०२६, पद्यलेखन स्पर्धा-२०२६, अनुभवकथन स्पर्धा-२०२६ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२६
  1.  गद्यलेखन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) ललितलेख   ब) कथा   क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध
  2.  पद्यलेखन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) पद्यकविता   ब) छंदमुक्त कविता   क) छंदोबद्ध कविता  ड) गझल   इ) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
  3. अनुभवकथन स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) शेतकरी जीवनातील सुखद अनुभव ब) शेतकरी जीवनातील दुःखद अनुभव
  4. समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२६ : विभाग : अ) महिला कवी/लेखिकांच्या पुस्तकाचे समीक्षण ब) शेतीविषयक ललित लेखांचे समीक्षण क) ग्रामीण कवितेचे रसग्रहण 

    (समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे.)

प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे :
  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
  • पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
  • एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल आणि विजेत्या रचना संमेलनाच्या विशेषांकात प्रकाशित केल्या जातील.

निकाल : निकाल १२ डिसेंबर २०२६ रोजी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या https://baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण : नियोजित १६ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत, याची आवर्जून नोंद घ्यावी. मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
 
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
 
  1. स्पर्धा १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
  2. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. ONLINE लेखन करण्यासाठीलेखन करा  https://baliraja.com/node/add/lekhan_spardha  या लिंकवर किंवा उजव्या बाजूच्या हिरव्या "लेखन करा" बटणवर क्लिक करा.
  3. स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका येथे baliraja.com/spardha-2026 या लिंकवर पाहता येतील.
  4. लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. लेखनस्पर्धेत लेखन कसे करावे?  याबद्दल https://baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
  5. स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह  abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
  6. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती  abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- लेखनप्रकाराचा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील/विदेशातील पोस्टाचा निवासी पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
  7. सदर स्पर्धा वैश्विक स्तरावर सर्व मराठी भाषिकांसाठी खुली आहे.
  8. स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. 
  9. परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी/स्पर्धा व्यवस्थापक/स्पर्धा आयोजक/स्पर्धा संयोजक सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
  10. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
  11. गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
  12. गझलेमध्ये किमान १ शेर तरी शेती/महिला/ग्रामीण जीवन विषयाशी निगडीत असावा अशी अपेक्षा आहे मात्र अनिवार्य किंवा बंधनकारक नाही. 
नियम व शर्ती :
 
  1. स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  2. स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  3. स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
  4. एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. (उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.)
  5. परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. (परीक्षक मंडळात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार, शेतकरी, कामगार, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असेल.) सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
  6. सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
  7. एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  8. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
  9. निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
  10. पारितोषिक स्वीकारायला अनेकदा काही विजेते स्वतः किंवा प्रतिनिधी उपस्थित राहात नाही त्यामुळे सन्मानचिन्ह बनवण्याचा खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे संमेलनाची प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे. 
  11. शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
 
आपले स्नेहांकित : संयोजक मंडळ
 
  • गंगाधर मुटे 
  • जयश्री कोटगीरवार (वर्धा) 
  • राजेंद्र फंड (अहिल्यानगर)
  • मुक्तविहारी (बीड)
  • निशा काळे (वर्धा) 
*  *  *
  • अधिक माहितीसाठी साहित्य चळवळ किंवा फेसबुक गृप येथे भेट द्या.
*  *  *
शेतकरी साहित्य चळवळ
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा
  • Log in or register to post comments
  • वाचनखूण साठवा
  • Like
  • 1474 views

प्रतिसाद (5)

वैचारिक लेखाचा विषय दिलेला…

Ajit1980

बुधवार, November 18, 2026 - 11:44
Permalink
New

वैचारिक लेखाचा विषय दिलेला नाही.कृपया तो द्यावा ही नम्र विनंती

  • Log in or register to post comments
लेखनाचा विषय : शेती/महिला…

admin

बुधवार, November 18, 2026 - 14:48
Permalink
New

लेखनाचा विषय : शेती/महिला/ग्रामीण जीवन या तीन पैकी एक कोणताही

  • Log in or register to post comments

In reply to वैचारिक लेखाचा विषय दिलेला… by Ajit1980

अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...

Madhuri_123

गुरुवार, November 26, 2026 - 15:30
Permalink
New

शिर्षक :
*अहो शेतकरी दादा...*
*तुमचं कसं होईल हो अमदा...?*

शिंपीत थेंब थेंब सळा...
गेला निघून पावसाळा...
जो येईल तो ऋतू कोरडाच , थेंबाथेंबाले शेतकरी मौताज अमदा बघून
अहो शेतकरी दादा...
तुमचं कसं होईल हो अमदा...?
असा भला मोठा शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न मनात बोचतो आहे.

दरवर्षी निसर्गाच्या दुष्काळाच्या नीती...कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांना होरपळण्याचा जणू निसर्ग डाव रचतो आहे की काय...?

निसर्गाचे बदलते हे चक्र पाहून काहींचे म्हणणे आहे की , माणूस बदलला, सत्य निती नियम माणूस विसरला आणि त्यामुळेच निसर्गाचे हे ऋतुचक्रही बदलले; पण मग त्याचे चटके शेतकऱ्यांनाच का ? का शेतकऱ्यांनाच प्रकोपाच्या झळा सोसाव्याया लागतात ? हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आणि विचारकरायला लावणारा आहे . कारण मेहनतीने भाकरी कमावून खाणाऱ्या आणि रयतेचे भरण पोषण करणाऱा शेतकरीच या निसर्गाच्या प्रकोपाचा बळी पडतो.

अशा या अस्मानी आणि सुलतानी निसर्गाच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. कारण किमती शेतीच्या वाढताहेत साहेब...शेतमालाच्या नाही आणि याचाच परिणाम म्हणजे उद्योगपती शेती मालक होत चालले आणि शेतकरी अल्पभूधारक. एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला नवनवीन खत औषध बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीने धुमाकूळ माजलेला...नवनवीन तंत्रज्ञाने शेती करण्याचा सल्ला कृषी अधिकारी कृषी सल्लागार देत आहेत आणि नवीन बदल करायला हवेतही, शेती करण्यासाठी नवीन तंत्र वापरायलाही पाहिजे पण नवीन तंत्रज्ञान वापरले तर पुन्हा जास्त खर्च वाढण्याची शक्यता, बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आधींच्या किमतीत भरमसाठ वाढ त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. नवीन तंत्रज्ञान वापरूनही त्या तुलनेत उत्पन्नात फारसी वाढ झाल्याचे दिसत नाही. शेतीसाठी लागणारा खर्चही वाढतीवरच आणि जीवनावश्यक गरजाही वाढतीवरच. अतिरिक्त खर्च करून अतिरिक्त धान्य पिकविले तरी मात्र भावबाजीचा प्रश्न ; शेतमालाचे भाव झुल्याला टांगलेले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. वर्षानुवर्षे मालाचे भाव तेच, त्यात झालेली वाढ ही अत्यल्प. इतर वस्तूंच्या तुलनेत ती वाढ नगण्यच म्हणायला हरकत नाही.
त्यातल्या त्यात निसर्गही साथ देत नाही कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आता नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे. आणि निसर्गावर औंलंबून असलेल्या शेतीचे व शेतकऱ्यांचे दिवस तर आता संपलेच असे संकेत दिसत आहेत. कारण निसर्ग साथ देत नाही बी बियाणे , फवारणीची औषधे यांच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण नाही; अशा अशा मारक यंत्रणेने शेतकऱ्यांच्या गळ्यातील कर्जाचा फास दिवसेंदिवस दिवस घट्ट होत आहे.

एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला...
नवनवीन खत औषध बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीने धुमाकूळ माजलेला...
आणि दुसरीकडे मात्र शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला...
अतिरिक्त खर्च करून अतिरिक्त धान्य पिकविले तरी मात्र खर्चाच्या तुलनेत धान्याला पाहिजे तसे बाजार भाव नाही...
त्यामुळे शिक्षण पाणी कपडालत्ता करता करता शेतकऱ्याच्या हातात उरी काहीच पडत नाही...
शेतीसाठी लागणारा खर्चही वाढतीवरच...
आणि जीवनावश्यक गरजाही वाढतीवरच...
त्यामुळे वाढत्या गरजांच्या ओझ्याने शेतकरी कर्जाच्या डोहात बुडत चालल्याने उरला सुरला पोटाचा कुटकाही आता शेतकरी विकण्याच्या मार्गावर आहेत. आणि मूठभर लोकांच्या हाती शेतीची मालकी येण्याची संभाव्य भीती दिसत आहे...!

आज शेती करणारा शेतकरी हा संभ्रमात पडलेला आहे. डिजिटल इंडियाचा हा नवा शेतकरी स्वतःलाही डिजिटल बनविण्याचा प्रयत्नात ऑनलाइन जाळ्यात गुंतलेला दिसतो आहे. कमी वेळात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे त्याचा कल आहे. त्यामुळे तो त्या दिशेने मार्ग शोधत आहे. आज तो नव्या तंत्रज्ञानाने शेती कशी करायची याचे प्रशीक्षण घेत आहे. याचाच फायदा घेत वेगवेगळी फवारणीची औषधं, खत, बियाणे, बीज प्रक्रियेचे तंत्र, यंत्र सर्व गोष्टींची नियोजनबद्ध माहिती देऊन कंपनी मालक या बिचाऱ्या बळीराजाला प्रलोभित करत आहेत;आणि याचा परिणाम म्हणजे पाऊस येण्याआधीच शेतकरी नियोजनाच्या नावाखाली बियाणं, खत, फवारणीचे औषध घेऊन ठेवतो. पाऊस येण्याआधीच कंपनी मालक, कृषी केंद्र यांची शेती पिकणे सुरू होते. इकडे मात्र शेतकरी पाऊस वेळेवर येईल की नाही..?उत्पन्न होईल की नाही...? कर्ज फिटेल की नाही..? या काळजीने त्याची झोप उडालेली असते. काळजीच्या विजा त्याच्या नसानसात कडाडत असतांना तो त्या ज्वाला आतल्या आत कसा गिळतो ते त्याचे त्यालाच ठाऊक.... तरी
सहनशीलतेचे पांघरून ओढून तो राबत जातो निष्ठेने...
एक ना एक दिवस कष्टाचे फळ मिळतील या आशेने...

इकडे मात्र निसर्गही त्याच्यावरच कोपलेला ;वरूणदेव अमृतधारांचा वर्षाव करून त्याला हर्षित करतो...ओला मृदगंध त्याच्या नसानसात मिसळून आत पेटलेल्या ज्वाला निवतो आणि पोशिंदा मनोमन सुखावून हंगामाला लागतो...सारणी फाडून बी तासाला लागते आणि तो सुखावलेला बघून निसर्ग मात्र त्याला थापा देऊन आपली मनमानी करतो...बियाण्यांना कोंब फुटतात पाऊस पसार होतो इवल्या त्या अंकुरांचा दम घुटून मोडी होतात आणि पुन्हा बियाणे, खतांच्या खरेदीसाठी जिथून मिळेल तिथून कर्ज घेऊन कृषी केंद्राकडे धाव घेतो. अशा परिस्थितीत तुटवड्याची शक्यता दर्शवून शेतकऱ्यांना वाढीव किमतीत बी बियाणे खते घ्यावी लागतात . त्याच्या त्या नुकसानीने पुन्हा त्याच्या मातं जगणारे रक्त पिऊन लाल होत जातात. आणि शेतकरी मात्र परिस्थीती पुढे लाचार असतो.
जगाच्या या पोशिंद्याच्या पायात फाटकी वाहान...
आणि त्यांच्या मात जगणारे सुटबूट घालून मारती तान..
अशा या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी दिवसेंदिवस
खर्चाच्या त्या ओझ्याने वाकत आहे.
तरी मनावर पडलेले घाव तो स्वतःच ढेवलांनी झाकत जातो...
आणि आशेचे बी पेरून मातीत वाट बघतो रात्रंदिवस डोळ्यातील हिरवं सपान फुलण्याची. वर्षभऱ्याच्या भाकरीचा प्रश्न त्याला सुखाने झोपू देत नाही... काळजीचे ढग त्याच्या डोळ्यात दाटलेले असतात...

मात्र वेळ येताच धान्य हाती येण्याची, कधी अवकाळी पाऊस तर कधी बोंड अळीचा हैदोस मालाची माती करून जातो. त्यातून मार्ग काढला कि नाही तर वन्य प्राण्याचा हैदोस, उरला सुरला माल शेतकऱ्यांच्या हाती लागतो. तिथेही खेळीच चालते...वर्षानुवर्ष मालाचे भाव तेच, बाढ झाली तरी ती अत्यल्प आणि शेतीवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढतीवरच...खत बियाण्यांच्या किमतीवर मात्र कुणाचे नियंत्रण नाही आणि शेतमालाच्या बाबतीत पिकविणारा नाही न आणि भलताच येऊन मालाचे भाव ठरवतो. याचा परिणाम म्हणजे शेतकरी पोटाचा कुटका विकून विकून कर्जाची पायी पायी चुकवत जातो.

आणि प्रश्न निर्माण होतो तो शेतकऱ्यांचा भवितव्यांचा भविष्यातील उद्योगपती नोकरदार वर्ग हा शेतकरी आणि शेतकरी हातमजुर होणार...तेव्हा त्याच शेतीमध्ये सोनं पिकणार...शेती करणाराच मालाचे भाव ठरवेल...कांदा टमाटरचे भाव वाढले तरी आंदोलनही होणार नाही; भाव वाढल्यावर आवाज उठवणारे लोक मुकाट्याने धान्य खरेदी करतील...!असे हे शेतकऱ्यांच्या भवितव्यांचे दृश्य बघता भीतीच्या वारूळाने मन अगदी सुन्न होऊन जातो...!

यावर्षीची दुष्काळाची परिस्थिती बघता शासनाच्या अनेक आकर्षक योजनेची फलक प्रतिसिद्धीसाठी मांडलेली दिसत आहेत. पण त्या योजनांची पात्रता निकष, अटी बघता गरजू शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळणे अशक्य लाभ दिसते . फरक इतकाच आताच्या योजना कागदोपत्री न राहता आता सोशल मीडियावर, स्टेटसवर फलकं सर्वांना मोहित करण्यापुरतेच त्या मर्यादित असल्याचे चित्र दिसत आहे.

अशी मारक यंत्रणा आणि यावर्षीच्या निसर्गाच्या कोरड्या दुष्काळाच्या झळा यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्ज चुकवू, शेतीच्या हंगामाला लावू कि घरात तिखटमिटाले लावू...?असा चिंतेचा भला मोठा दगड त्याच्या डोक्यावर घाव घालून त्याची झोप उडवित आहे.तरीही मोठ्या हिमतीने तो शेती करत आहे. फासे संकटांचे सोडवून आयुष्याचे दोहे सोडवतो आहे . तरीही अजून वर्ष बाकी आहे. तग धरून धरून किती दिवस धरणार ? नोकर वर्गाला तर एक महिना पगाराला उशीर झाला तरी त्यांची तारांबळ उडते. आणि संप सुरू होतात मग शेतकऱ्यांसमोर वर्ष काढणं म्हणजे आयुष्याची परीक्षाच ! भला मोठा हा आयुष्याचा पेपर सोडवणे सोपे नाही. पुढील हंगामाचं कसं होणार वर्षभराच्या भाकरीचं, लेकराच्या शिक्षणपाण्याचं कसं होणार ? हा प्रश्न मात्र पाषाणासारखा तसाच उभा राहतो...

सौ माधुरी प्रमोदराव वरवटकर
मु. पो. मांडगाव, ता. समुद्रपूर जि. वर्धा
पोस्ट - मांडगाव
पिनकोड ४४२१०२
मो. नं. ९५८८४१४३०४
इमेल Madhuriwarwatkar1983@gmail.com*अहो शेतकरी दादा...*
*तुमचं कसं होणार आमदा...*

शिंपीत थेंब थेंब सळा...
गेला निघून पावसाळा...
जो येईल तो ऋतू कोरडाच...थेंबाथेंबाला शेतकरी मौताज अमदा बघून
अहो शेतकरी दादा...
तुमचं कसं होईल हो अमदा...?
असा भला मोठा शेतकऱ्यांच्या भविष्याचा प्रश्न मनात बोचतो आहे.

दरवर्षी निसर्गाच्या दुष्काळाच्या नीती...कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाने शेतकऱ्यांनाक होरपळण्याचा जणू निसर्ग डाव खेळतो आहे की काय...?

निसर्गाचे बदलते हे चक्र पाहून काहींचे म्हणणे आहे की , माणूस बदलला, सत्य निती नियम माणूस विसरला आणि त्यामुळेच निसर्गाचे हे ऋतुचक्रही बदलले; पण मग त्याचे चटके शेतकऱ्यांनाच का...? हा प्रश्नही यावेळी तितकाच महत्त्वाचा आणि विचारकरायला लावणारा आहे . कारण मेहनतीने भाकरी कमावून खाणाऱ्या आणि रयतेचे भरण पोषण करणाऱ्या शेतकऱ्यांवरच हा निसर्गाचा आक्रोश का...?

अशा या अस्मानी आणि सुलतानी निसर्गाच्या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. कारण किमती शेतीच्या वाढताहेत साहेब...शेतमालाच्या नाही आणि याचाच परिणाम म्हणजे उद्योगपती शेती मालक होत चालले आणि शेतकरी अल्पभूधारक. एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला नवनवीन खत औषध बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीने धुमाकूळ माजलेला...नवनवीन तंत्रज्ञाने शेती करण्याचा सल्ला कृषी अधिकारी कृषी सल्लागार देत आहेत आणि नवीन बदल करायला हवेतही, शेती करण्यासाठी नवीन तंत्र वापरायलाही पाहिजे पण नवीन तंत्रज्ञान वापरले तर पुन्हा जास्त खर्च वाढण्याची शक्यता, बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके आधींच्या किमतीत भरमसाठ वाढ त्यावर कुणाचेच नियंत्रण नाही. नवीन तंत्रज्ञान वापरूनही त्या तुलनेत उत्पन्नात फारसी वाढ झाल्याचे दिसत नाही. शेतीसाठी लागणारा खर्चही वाढतीवरच आणि जीवनावश्यक गरजाही वाढतीवरच. अतिरिक्त खर्च करून अतिरिक्त धान्य पिकविला तरी मात्र भावबाजीचा प्रश्न ; शेतमालाचे भाव झुल्याला टांगलेले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. वर्षानुवर्षे मालाचे भाव तेच, त्यात झालेली वाढ ही अत्यल्प. इतर वस्तूंच्या तुलनेत ती वाढ नगण्यच म्हणायला हरकत नाही.
त्यातल्या त्यात निसर्गही साथ देत नाही कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आता नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला आहे. आणि निसर्गावर औंलंबून असलेल्या शेतीचे व शेतकऱ्यांचे दिवस तर आता संपलेच असे संकेत दिसत आहेत. कारण निसर्ग साथ देत नाही बी बियाणे , फवारणीची औषधे यांच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण नाही; अशा अशा मारक यंत्रणेने शेतकऱ्यांच्या गळ्यातील कर्जाचा फास दिवसेंदिवस दिवस घट्ट होत आहे.

एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला...
नवनवीन खत औषध बियाणे कंपन्यांच्या जाहिरातीने धुमाकूळ माजलेला...
आणि दुसरीकडे मात्र शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला...
अतिरिक्त खर्च करून अतिरिक्त धान्य पिकविले तरी मात्र खर्चाच्या तुलनेत धान्याला पाहिजे तसे बाजार भाव नाही...
त्यामुळे शिक्षण पाणी कपडालत्ता करता करता शेतकऱ्याच्या हातात उरी काहीच पडत नाही...
शेतीसाठी लागणारा खर्चही वाढतीवरच...
आणि जीवनावश्यक गरजाही वाढतीवरच...
त्यामुळे वाढत्या गरजांच्या ओझ्याने शेतकरी कर्जाच्या डोहात बुडत चालल्याने उरला सुरला पोटाचा कुटकाही आता शेतकरी विकण्याच्या मार्गावर आहेत. आणि मूठभर लोकांच्या हाती शेतीची मालकी येण्याची संभाव्य भीती दिसत आहे...!

आज शेती करणारा शेतकरी हा संभ्रमात पडलेला आहे. डिजिटल इंडियाचा हा नवा शेतकरी स्वतःलाही डिजिटल बनविण्याचा प्रयत्नात ऑनलाइन जाळ्यात गुंतलेला दिसतो आहे. कमी वेळात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे त्याचा कल आहे. त्यामुळे तो त्या दिशेने मार्ग शोधत आहे. आज तो नव्या तंत्रज्ञानाने शेती कशी करायची याचे प्रशीक्षण घेत आहे. याचाच फायदा घेत वेगवेगळी फवारणीची औषधं, खत, बियाणे, बीज प्रक्रियेचे तंबियाणे, यंत्र सर्व गोष्टींची नियोजनबद्ध माहिती देऊन कंपनी मालक या बिचाऱ्या बळीराजाला प्रलोभित करत आहेत;आणि याचा परिणाम म्हणजे पाऊस येण्याआधीच शेतकरी नियोजनाच्या नावाखाली बियाणं, खत, फवारणीचे औषध घेऊन ठेवतो. पाऊस येण्याआधीच कंपनी मालक, कृषी केंद्र यांची शेती पिकणे सुरू होते. इकडे मात्र शेतकरी पाऊस वेळेवर येईल की नाही..?उत्पन्न होईल की नाही...? कर्ज फिटेल की नाही..? या काळजीने त्याची झोप उडालेली असते. काळजीच्या विजा त्याच्या नसानसात कडाडत असतांना तो त्या ज्वाला आतल्या आत कसा गिळतो ते त्याचे त्यालाच ठाऊक.... तरी
सहनशीलतेचे पांघरून ओढून तो राबत जातो निष्ठेने...
एक ना एक दिवस कष्टाचे फळ मिळतील या आशेने...

इकडे मात्र निसर्गही त्याच्यावरच कोपलेला ;वरूणदेव अमृतधारांचा वर्षाव करून त्याला हर्षित करतो...ओला मृदगंध त्याच्या नसानसात मिसळून आत पेटलेल्या ज्वाला निवतो आणि पोशिंदा मनोमन सुखावून हंगामाला लागतो...सारणी फाडून बी तासाला लागते आणि तो सुखावलेला बघून निसर्ग मात्र त्याला थापा देऊन आपली मनमानी करतो...बियाण्यांना कोंब फुटतात पाऊस पसार होतो इवल्या त्या अंकुरांचा दम घुटून मोडी होतात आणि पुन्हा कर्जाचे दडपण पुन्हा बियाणे, खतांची खरेदी पुन्हा पुन्हा पेरणी त्याच्या त्या नुकसानीने पुन्हा त्याच्या मातं जगणारे रक्त पिऊन लाल होत जातात...
आणि शेतकरी मात्र परिस्थीती पुढे लाचार...

खर्चाच्या त्या ओझ्याने वाकत जातो...
मनावर पडलेले घाव तो स्वतःच ढेवलांनी झाकत जातो...
आशेचे बी पेरून मातीत वाट बघतो रात्रंदिवस डोळ्यातील हिरवं सपान फुलण्याची... वर्षभऱ्याच्या भाकरीचा प्रश्न त्याला सुखाने झोपू देत नाही... काळजीचे ढग त्याच्या डोळ्यात दाटलेले असतात...

मात्र वेळ येताच धान्य हाती येण्याची, कधी अवकाळी पाऊस तर कधी बोंड अळीचा हैदोस मालाची माती करून जातो आणि उरला सुरला माल शेतकऱ्यांच्या हाती लागतो. तिथेही खेळीच चालते...वर्षानुवर्ष मालाचे भाव तेच, बाढ झाली तरी ती अत्यल्प आणि शेतीवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढतीवरच...खत बियाण्यांच्या किमतीवर मात्र कुणाचे नियंत्रण नाही आणि शेतमालाच्या बाबतीत पिकविणारा नाही न आणि भलताच येऊन मालाचे भाव ठरवतो. याचा परिणाम म्हणजे शेतकरी पोटाचा कुटका विकून विकून कर्जाची पायी पायी चुकवत जातो.

आणि प्रश्न निर्माण होतो तो शेतकऱ्यांचा भवितव्यांचा भविष्यातील उद्योगपती नोकरदार वर्ग हा शेतकरी आणि शेतकरी हातमजुर होणार...तेव्हा त्याच शेतीमध्ये सोनं पिकणार...शेती करणाराच मालाचे भाव ठरवेल...कांदा टमाटरचे भाव वाढले तरी आंदोलनही होणार नाही; भाव वाढल्यावर आवाज उठवणारे लोक मुकाट्याने धान्य खरेदी करतील...!असे हे शेतकऱ्यांच्या भवितव्यांचे दृश्य बघता भीतीच्या वारूळाने मन अगदी सुन्न होऊन जातो...!

यावर्षीची दुष्काळाची परिस्थिती बघता शासनाच्या अनेक आकर्षक योजनेची फलक प्रतिसिद्धीसाठी मांडलेली दिसत आहेत. पण त्या योजनांची निकष, अटी बघता गरजू शेतकऱ्यांना त्या योजनांचा लाभ मिळणे अशक्य लाभ दिसते . फरक इतकाच आताच्या योजना कागदोपत्री न राहता आता सोशल मीडियावर, स्टेटसवर फलकं सर्वांना मोहित करण्यापुरतेच त्या मर्यादित असल्याचे चित्र दिसत आहे.

अशी मारक यंत्रणा आणि यावर्षीच्या निसर्गाच्या कोरड्या दुष्काळाच्या झळा यामुळे शेतकऱ्यांसमोर कर्ज चुकवू, शेतीच्या हंगामाला लावू कि घरात तिखटमिटाले लावू...?असा चिंतेचा भला मोठा दगड त्याच्या डोक्यावर घाव घालून त्याची झोप उडवित आहे.तरीही मोठ्या हिमतीने तो शेती करत आहे. फासे संकटांचा सोडवून आयुष्याचे दोहे सोडवतो आहे . तरीही अजून वर्ष बाकी आहे. तग धरून धरून किती दिवस धरणार ? नोकर वर्गाला तर एक महिना पगाराला उशीर झाला तरी त्यांची तारांबळ उडते. आणि आंदोलन सुरू होतात मग शेतकऱ्यांसमोर वर्ष काढणं म्हणजे आयुष्याची परीक्षाच ! भला मोठा हा आयुष्याचा पेपर सोडवणे सोपे नाही. पुढील हंगामाचं कसं होणार वर्षभराच्या भाकरीचं कसं होणार ? हा प्रश्न मात्र पाषाणासारखा तसाच उभा राहतो...

सौ माधुरी प्रमोदराव वरवटकर
मु. पो. मांडगाव, ता. समुद्रपूर जि. वर्धा
पोस्ट - मांडगाव
पिनकोड ४४२१०२
मो. नं. ९५८८४१४३०४
इमेल Madhuriwarwatkar1983@gmail.com

  • Log in or register to post comments

In reply to वैचारिक लेखाचा विषय दिलेला… by Ajit1980

जिद्द : एक आत्मकथन

P D Katkar

बुधवार, November 25, 2026 - 00:01
Permalink
New

*जिद्द : एक आत्मकथन!*

"व्यवसाय धंदा नसलेल्या आपल्या खेड्यात शेती हाच प्रमुख व्यवसाय, अन् ज्यांचेकडे भरपूर शेती आहे, ते खरे भाग्यशाली श्रीमंत" अशी माझी बालपणापासूनच धारणा झालेली असल्याने मी शेतीकडे वळलो, विविध प्रयोग केले आणि सुखद दुःखद प्रसंगातही या धरणीमायेने सांभाळले.

तसे पाहिले तर गर्भ श्रीमंत घरातील वारसा लाभलेला, पण त्या श्रीमंतीचा शुभाशीर्वाद मिळाला नव्हताच. पूर्वजांपासून मिळालेली जन्मजात श्रीमंती वडिलांनी मनसोक्त उपभोगत संपविली आणि बालपणापासूनच मला दारिद्र्याचे चटके नियमितपणे धक्के देऊ लागले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत इयत्ता चौथी पर्यंतचा काळ थोडाफार सुखाचा गेला आणि पुढच्या शिक्षणाची कास धरली असता संकटांनीही प्राथमिक अवस्था सोडून पुढची पायरी गाठली.

वडिलांच्या गांजाच्या धूरा सोबत श्रीमंती उडून गेली, खाणे-पिणे बंद झाले तसे मित्रही दूर झालेत. घरातील तंग वातावरणाला कंटाळून अन् दारिद्र्याच्या असह्य झळा सोसून न झाल्याने बाप आपल्या आईला सोबत घेऊन घर सोडून गेला तो कायमचाच! तेव्हा मी युगांतर वसतिगृहात राहून दहावीचे शिक्षण घेत होतो. अचानक एके दिवशी आजी रडत रडत होस्टेलमध्ये आली आणि बाबा तिकडे बाहेरगावीच मृत्यू पावल्याची खबर दिली. झाले, आजीला घेऊन गावी आपल्या घरी जाणे भाग पडले. बाहेरगावी कामाला गेलेल्या माझ्या आईला सांगावा धाडला, एका मोठ्या विवाहित बहीणीकडे ठेवलेल्या लहान बहिणीला मी घेऊन आलो अन् जाती व रुढी-परंपरेनुसार बापाच्या तेरविच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करु लागलो. मनाला अजिबात न पटणाऱ्या या परंपरेला बंड थोपटून फाटा देण्याची हिंमत नव्हती. शेवटी कसातरी तो कार्यक्रम पार पाडला.
या व्यस्ततेमुळे बरेच दिवस शाळेत जाता आले नाही. "परीक्षेच्या फार्म सही करायला तरी शाळेत ये" हा वर्ग शिक्षकांचा निरोप कळताच शाळेत गेलो. सत्य परिस्थितीची जाणीव अन् माझी हतबलता बघून सरांनीच माझे परीक्षा शुल्क भरले. चांगले प्राप्तांक घेऊन शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गावातील सूज्ञ लोकांनी वर्गणी गोळा करून पुढे मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाठविले.
शिक्षकांची मदत, गावातील लोकांची आस्था, समाज ॠण यामुळे शिक्षण घेता आले. बापाच्या व्यसनाधीनतेनेच दारिद्र्य ओढवले, ही धारणा, त्यामुळे आपण स्वतः कोणत्याही व्यसनाला जवळपास फिरकू द्यायचे नाही, हा निर्धार! पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी तडजोड करून लग्न आटोपले खरे, पण लवकरच नोकरी लागली अन् थोडे सुखाचे चांदणे उगवले.

खरं तर आता मी शेतीकडे वळलो. आमच्या कुटुंबात होती, म्हणजे बापाने विकली तेवढी २२ एकर जमीन झालीच पाहिजे म्हणून निर्धार केला. खूप कर्ज काढले, मित्रांकडूनही रक्कम उचलली अन् निदान ५ लोकांकडून ओबडधोबड, जंगल स्वरुपाची एकाच ठिकाणी असलेली सलग १६ एकर पडीत शेती खरेदी केली. "इथे हा इसम खडीसाखर पिकविणार आहे" अशा लोकनिंदा ऐकल्यात. "कशाला रे पडतोस या शेतीच्या भानगडीत? विकून टाक, तूझे पैसे तरी निघतील, येथे साधे गवत उगवत नाही, कसले पिक काढणार आहेस तू?" कदाचित हितचिंतक, कदाचित शत्रूपक्ष मला वारंवार न मागता सल्ला देत असत. तारुण्याचा सारा जोम, रग मी त्या मातीत खर्ची घातला. आम्ही पती-पत्नी उभयता खूप कष्टलो. नोकरी सांभाळून शेती केली, पाणी टंचाईत पाणी पुरवठा करण्यासाठी कधी बायकोला तर कधी मजूरांना सोबतीला घेत शेतात रात्री जागून काढल्या. खूप परिश्रम घेतलेत. एका सरकारी नोकरीवाल्या कर्मचाऱ्याची बायको आहे, या आविर्भावात माझु पत्नी कधीच वावरली नाही. जिद्दीला पेटून आम्ही त्या बंजार-भूमीचे सूपिक शेतजमिनीत रूपांतर केले. आरंभी लगतच्या नाल्यावर डिझेल इंजिन लावले. महागडे डिझेल आणि वेळेवर मिळत नसल्याचे बघून
इलेक्ट्रिक मोटार लावली. पाणी पूरत नाही म्हणून विहीर तयार केली. लागवडीचे क्षेत्र वाढत गेले, पाणी पूरवठा बरोबर होत नाही, म्हणून एक, दोन नाही, तब्बल तीन बोअरवेल निर्माण केल्यात. आता गरजेनुसार पाणी, ही समस्या मिटली. खोदकाम केले, मोठमोठ्या बांध्या तयार करुन खरेदी केलेल्या जमीनीचे सर्वच क्षेत्र लागवडीखाली आणले. शेणखताचा नियमित वापर, ट्रॅक्टरची सुविधा आणि व्यवस्थित मशागत करून पिक घेत आहे. होय, काही वर्षे इतरांना कसायला दिली होती जमीन, नाही असे नाही..‌. पण दुसरे लोक केवळ रासायनिक खतांचा मारा करतात, शेतीला ओरबाडून टाकतात...ते पहावले नाही. त्यामुळे मी स्वतःच शेती करतो आहे.
आज मी माझ्या शेती-माऊलीपासून समाधानी आहे.

  • Log in or register to post comments
चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले

गंगाधर मुटे

बुधवार, November 25, 2026 - 00:43
Permalink
New

आपण चुकीच्या ठिकाणी लेखन प्रकाशित केले आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून लेखन करावे. 

https://www.baliraja.com/node/add/spardha_2016

  • Log in or register to post comments

In reply to जिद्द : एक आत्मकथन by P D Katkar

बळीराजावरील विनोदी लेखन 
वाचा आणि आनंद घ्या
संकेतस्थळवरील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी
 खाते बनवा आणि लॉगिन करा

प्रकाशन दिनांक लेख/कविता/गझलेचे शीर्षक वाचनसंख्या प्रतिसाद संख्या साहित्य प्रकार अंतिम अद्यतन
21-01-2010 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका ॥२०॥ 26,278 4 रानमेवा 4 years 3 months
11-06-2009 पहाटे पहाटे तुला जाग आली : विनोदी कविता ॥२५॥ 44,178 8 रानमेवा 4 years 3 months
11-06-2011 पराक्रमी असा मी 17,238 1 रानमेवा 4 years 4 months
10-11-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ 13,021 1 माझे गद्य लेखन 8 years
25-07-2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ 11,492 1 माझे गद्य लेखन 8 years
15-02-2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका 14,382 5 नागपुरी तडका 8 years
23-03-2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट! 11,217 3 माझी कविता 9 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ 21,838 3 माझे गद्य लेखन 10 years 4 months
14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) 9,108 2 माझी मराठी गझल 12 years
24-05-2012 उद्दामपणाचा कळस - हझल 9,001 2 माझी मराठी गझल 12 years 8 months
19-05-2012 कापला रेशमाच्या सुताने गळा 32,242 1 माझी मराठी गझल 12 years 8 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग-३ 17,247 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
30-06-2011 अशीही उत्तरे-भाग - २ 15,244 1 माझे गद्य लेखन 13 years 7 months
16-12-2013 'कमल’ ’आप’के ’हाथ’ - विडंबन गीत 4,638 0 माझी कविता
21-08-2011 राखेमधे लोळतो मी (हजल) 7,972 0 माझी मराठी गझल
15-06-2011 मग हव्या कशाला सलवारी 10,266 0 रानमेवा
19-06-2011 छातीचं झाकण बोम्लीवर आलं 11,365 0 रानमेवा
22-06-2011 मांसाहार जिंदाबाद ...!! 16,624 0 रानमेवा
18-06-2011 आंब्याच्या झाडाले वांगे 11,434 0 रानमेवा

शोध

सदस्य प्रवेश

CAPTCHA
हे सोपे गणित सोडवा आणि त्याचे उत्तर लिहा. उदा. 1+3 साठी, 4 लिहा.
हा प्रश्न तुम्ही मानव आहात की नाही हे तपासण्यासाठी आणि मशीनद्वारे होणारे स्पॅम/फ्रॉड अटॅक रोखण्यासाठी आहे.
  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

माझे खाते (current-user)

  • माझ्या वाचनखुणा
  • लॉग इन करा
वाचकांच्या भेटी

 
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या *Au* एकूण भेटी 

 

माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
 

Find बळीराजा डॉट कॉम on Sharad-joshi-inFind बळीराजा डॉट कॉम on Abmssc-PageFind बळीराजा डॉट कॉम on FacebookFind बळीराजा डॉट कॉम on TwitterFind बळीराजा डॉट कॉम on Youtube

Who's online उपस्थित सदस्य

बळीराजावर सध्या 2 सदस्य उपस्थित आहेत.
  • Nilesh
  • Subhash.patil

Visitors Online/उपस्थित पाहुणे

  • सध्या साईटवरील लेखन वाचण्यासाठी उपस्थित पाहुणे: 44 *
Who's new नवीन सदस्य
  • anjaliwaghmare…
  • जयश्री कोटगीरवार
  • Anant
  • Abhay Dandekar
  • bade-bhaskar

Recent comments ताजे प्रतिसाद

  • अहो शेतकरी दादा... तुमचं कसं होईल हो अमदा...
    15 minutes ago
  • मनःपूर्वक धन्यवाद भाऊ
    2 hours 26 minutes ago
  • शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
    2 hours 35 minutes ago
  • मस्तच
    6 hours 47 minutes ago
  • हार्दिक आभार
    9 hours 31 minutes ago

आज सर्वाधिक वाचन

शीर्षक आजचे वाचन
स्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी - १० जुलै २०१४ 151
संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती 57
आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून! 54
पिकलेला काटा अन् करपलेली पिके 51
शरद जोशी आणि माझ्यातली कार्यकर्ती 50
पायाखालची वीट दे : भक्तीगीत ।।७।। 43
कापला रेशमाच्या सुताने गळा 35
किती चाटणार भारतपुत्रा? 28
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२६ : वर्ष १३ वे 27
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी' 21
आजचे शेतमालाचे बाजारभाव 16
माझे फेसबूक स्टेटस-1 13
अट्टाहास 12
प्रतिनिधी नोंदणी कशी करावी : १६ वे मराठी शेतकरी साहित्य संमेलन (वर्धा जिल्हा) - २०२६ 10
गझल 10
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 9
दुःख मातीतले.... 9
किसान क्रांती 9
कार्यक्रमपत्रिका : ११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक 7
माझे फेसबूक स्टेटस - 2 7

Pagination

  • Current page 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page ››
  • Last page Last »
more

लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)

शीर्षक वाचनसंख्या
पोळ्याच्या झडत्या 218,018
माझे फेसबूक स्टेटस-1 180,995
शुभारंभ 134,916
रानमेवा - भूमिका 109,388
नागपुरी तडका - ई पुस्तक 107,403
आजचे शेतमालाचे बाजारभाव 92,698
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता 87,544
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....! 82,834
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा 79,585
उद्देश आणि भूमिका 77,450
विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह 73,635
विचारपूस 71,736
गणपतीची आरती ॥३५॥ 67,754
सत्कार समारंभ : वर्धा 66,734
शेतकरी संघटना लोगो, बिल्ला 63,327
किती चाटणार भारतपुत्रा? 61,809
जात्यावरची गाणी 56,019
माझे फेसबूक स्टेटस - 2 49,433
महाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात 47,048
हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट : नागपुरी तडका ।।९।। 46,356
more

शुभारंभ - FT2

संकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९    ©लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.   नियमावली

Copyright © Baliraja.Com - All rights reserved

Developed and Designed by : Gangadhar Mute For अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळ Sheti Arth Prabodhini