अट्टाहास
कशासाठी हा अट्टाहास,
प्रतिकार म्हणून का प्रवास,
जो तो करतोय दुस्वास,
म्हणून तर बनतेय ना खास,
सहनही न करता येई हो हा त्रास,
पुढे आता आजूबाजूचा ऱ्हास,
स्वतःच्या शोधात निघाले,
बघावं सावरता येत का थोडं ते बघते,
स्वार्थासाठीच तर हा सगळा कडेलोट,
कितीही नावे ठेवा,
ना सोडे चिकाटी,
कुठवर हि तुमचीच दमदाटी,
किती आवरावा हा पसारा,
अन् कधी मिळेल सुटकारा,
पदरात काय ह्याचा ना केला विचार,
पण आता खूपच सालं कारण,
विशी, तिशी, चाळीशीही सरली,
पन्नाशी सरण्याआधी...सरणावर जाण्याआधी...
म्हणलं जगून घ्यावं थोडंसं..
व्हाव मुक्त, स्वच्छंदी.. अन् बरच काही.. जस की,
गुंतावं स्वतः मध्येच,
कुठवर थांबावावं अन् कशासाठी,
हिशोब कधी लागणार,
काळ्याचे पांढरे कधी झाले ना कळले,
दिवसासारखे वर्ष गेले,
अन् वर्षासारखे तप,
असं नको वाटायला की मी न जगले,
म्हणून तर हे स्विकारले, साकारले,
मी आता करणार माणसंच विचार,
जरी अवगत असले सगळे सोपस्कार..
डॉ. अंजली अनंतराव वाघमारे
दिनांक: ०५/०१/२०२५

प्रतिसाद (1)
मस्तच
Rajshree
मस्तच