मी आणि माती
एकांत हा छळतो मनाला
थकला हा जीव रोजच्या कष्टाला..
मन मंदिरात माझ्या
जागा काळ्या आईला..
उसंत हवी शरीराला
ओढ तुझ्या स्पर्शाची..
मन माझे पाखरू होते
तुझ्यापाशीच विसावते..
रोजचा जुगार मी नेहमीच हरतो
फक्त तुझ्यासाठीच..
तु वांज मला बघवत नाही
सारा अट्टाहास फक्त तुझ्या
हिरव्या शालूसाठीच..
तुला मोहरताना पहाया मला आवडते
म्हणून मी रात्रंदिवस..
तुझ्यासाठीच झुरतो
शेवटचा श्वासही तुझ्या कुशीतच विरतो..
तुझं काळ दिसणं
मनाला भुरळ घालतं..
तुझं बहरन म्हणजे
नववधू सारखं दिसतं..
सौ.उज्वला शिंदे, भंडीशेगाव
8766961104
