शकील माझ्या आधुनिक बनवलं.
नागराला नाही, वखराला नाही, नाही तीपणीला धरलं |
माझ्या वावराले आज मी ट्रॅक्टरने पेरलं,|
शेतीला माझ्या आज मी आधुनिक बनवलं |
कोळप्याने नाही, हातानं नाही, मजुरान नाही, नाही तन नाशकाला फवारलं |
वावराला माझ्या आज मी मल्चिंग न सजवलं | शेतीला माझ्या आज मी आधुनिक बनवलं |
दांडाने नाही, पाटाने नाही, मोकळ नाही,
नाही पाणी स्पिंकलर न वापरलं |
वावराले माझ्या आज मी ड्रीपने भिजवलं |
शेतीला आज माझ्या मी आधुनिक बनवलं |
हातानं नाही,हात पंपाने नाही, पेट्रोल पंपाने नाही, नाही चार्जिंग पंपाने शिंपल |
कीटकनाशकाला आज मी हवाई द्रोण ने फवारलं |
शेतीला माझ्या आजमी आधुनिक बनवले | हातानं नाही,गोपनीन नाही, दगडाने नाही,नाही आवाजाने पाखरांना हाकलले |
बागेला माझ्या आज मी प्लास्टिक फोमणे सजवले |
शेतीला आज माझ्या मी आधुनिक बनवले |
मोटेने नाही, डिझेल पंपाने नाही, नाही विद्युत पंपाले वापरले |
विहिरीवर आज माझ्या मी सौर पंपाला बसवले |
शेतीला आज माझ्या मी आधुनिक बनवले |
डॉ. सुभाष पाटील
संत ज्ञानेश्वर महाविद्यालय
सोयगाव छ. संभाजीनगर
