*कणखर बळीराजा*
अनवाणी तो राबतो,
झरा घामाचा झरतो.
उभे हिरवे शिवार
रंग पोशिंद्याचा खुलतो.
अवकाळी काळा वार,
घाव छातीत शेताच्या.
जळधारा तलवारी
भिंती रडती बांधाच्या.
कृषकाची मेहनत,
स्वप्न पिकं ओंजळीत.
ओल्या, लोंबत्या पिकांचे
लोटागणं क्षणार्धात.
टाहो फोडे माळरान,
ओसळल्या वाटेखाली.
मातीतल्या बालकांची
प्राणज्योती मंदावली.
पोशिंद्याच्या घामावर
चाले दुनियेची स्वारी.
पावसाच्या रे झोक्याने
चूल घरची विझली.
तरी उभा वादळात,
मनगटी खरी ज्वाला.
शेतकरी कणखर -
कवटाळी संकटाला.
सौ किरण महादेव चौधरी, गडचिरोली
9403431406
